'बाबा' म्हणतात, मतदारच निष्काळजी, अशी कुरकूर योग्य नाही !

'बाबा' म्हणतात, मतदारच निष्काळजी, अशी कुरकूर योग्य नाही !

  • Share this:

7568cm_on_voting_list25 एप्रिल : झोपडपट्टीत राहणार्‍यांनी मतदार यादीतल्या घोळाविषयी नाराजी व्यक्त केली तर मी समजू शकतो, पण कॉर्पोरेट्सनी अशी कुरकूर करणं, योग्य नाही असं मत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय.

तसंच यावेळी आपली नावं मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाईटवर उपलब्ध होती त्यामुळे हा मतदारांचा निष्काळजीपणा आहे, असं खापरच मुख्यमंत्र्यांनी मतदारांवर फोडलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन नेटवर्कला विशेष मुलाखत दिली होती यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसर्‍या टप्प्यात मतदानाच्या वेळी मतदार याद्यातून मतदारांची नावं नसल्याची बाब समोर आली. पुण्यामध्ये जवळपास 1 लाख लोकांना मतदान करता आले नाही.

तर त्यापाठोपाठ तिसर्‍या टप्प्यात मतदानाच्या वेळीही मुंबई आणि ठाण्यामुळे मतदारांची नावं यादीत नसल्याचं समोर आलं. ठाण्यामध्ये तब्बल सहा लाख लोकांची नावं वगळण्यात आली. याप्रकरणी मतदान झाल्यानंतर निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रम्हा यांनी माफी मागितली. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारांवरच निष्काळजीपणाच खापर फोडलंय.

मुख्यमंत्री म्हणतात,

"मुंबईकरांनी तरी असा दोष देऊ नये. यात त्यांची हलर्गजी होती. यावेळी नावं वेबसाईटवर होती. मी एका आघाडीच्या कॉर्पोरेट अधिकार्‍यांचं नाव गायब असल्याचं वाचलं. जर आपल्याला एखादी आंतरराष्ट्रीय फ्लाईट गाठायची असेल, तर आपण 24 तास आधी रिझर्वेशनची खात्री करतो. मग तुमचं नाव मतदार यादीत आहे की, नाही हे तुम्हाला तुमच्या सेक्रेटरीला तपासायला सांगता आलं नाही का ? झोपडीत राहणार्‍यांनी तक्रार केली तर मी समजू शकतो.पण कॉर्पोरेट्सनी त्यांचं नाव नसल्याची तक्रार करणं योग्य नाही. ही त्यांचा निष्काळजीपणा आहे. -मुख्यमंत्री

First published: April 25, 2014, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading