24 एप्रिल : लोकसभेसाठी राज्यात तिसर्या टप्प्यासाठी 19 मतदारसंघात मतदान सुरू आहे. पण पुणे पाठोपाठ मुंबई आणि इतर मतदारसंघातही आपलं नाव मतदार यादीत नसल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे.
आज सकाळी मुंबईत अभिनेते अतुल कुलकर्णी यांना मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता आले नाही. त्यांच्यापाठोपाठ वंदना गुप्ते यांनाही याचा फटका बसला. वंदना गुप्त यांनाही मतदान करता आले नाही. मतदारांना मदत करण्यासाठी आयबीएन लोकमतने विशेष मोहीम सुरू केलीय.
जर आपलं नाव यादीत नसेल तर तुम्ही थेट महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी किंवा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कार्यलयाशी संपर्क साधू शकता.तसंच निवडणूक किंवा मतदार याद्यांसदर्भातल्या तक्रारी तर मतदारांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतात. यासाठी खाली माहिती देण्यात आलीय.
आयबीएन लोकमतची मोहीम माझं मत, माझा हक्क
तुमचं मतदान यादीत नाव नसेल, तर इथे संपर्क साधा.
नितीन गद्रे
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र
मंत्रालय, मुंबई.
हेल्पलाईन: 1800-22-1950 (टोल फ्री)
ईमेल: ceo_maharashtra@eci.gov.in
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त
फोन नंबर: 011-23717391
मदतीसाठी वेबसाईट:
www.eci-citizenservicesforofficers.nic.in
ऑनलाईन तक्रारीसाठी या वेबसाईटवर संपर्क साधू शकता
ऑनलाईन तक्रारीसाठी- http://www.eci-citizenservicesforofficers.nic.in/cservices/default.aspx
किंवा
लेखी तक्रारीसाठी
निवडणूक आयोग
निर्वाचन सदन
अशोका रोड, नवी दिल्ली-110001
किंवा फोन नंबर-
011-23717391
0-11-23717391
011- 23717392
011- 23717393
Follow @ibnlokmattv |