मुंबईत पहिल्यांदाच पन्नाशी पार, राज्यात सरासरी 55 टक्के मतदान

मुंबईत पहिल्यांदाच पन्नाशी पार, राज्यात सरासरी 55 टक्के मतदान

  • Share this:

43mumbai_election_n24 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशात सहाव्या टप्प्यात 117 जांगासाठी मतदान पार पडलं. तर महाराष्ट्रात 19 जागांसाठी मतदान पूर्ण झालंय. मुंबईसह ठाणे, रायगड, नंदूरबार, नाशिक, औरंगाबार, धुळे, जळगाव, कल्याण, पालघर, भिवंडी,रायगड, दिंडोरी, रावेर आणि जालना अशा 19 ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं.

मुंबईत मागील वर्षीचा आकाडा मोडीत पन्नाशी पार केलीय. मुंबईत सरासरी 52 टक्के मतदान झालं. तर राज्यात एकूण सरासरी 55.33 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी सकाळी मुंबईत उत्साह दिसून आला. मात्र दुपारच्या उन्हाच्या कडाक्यामुळे अनेक मतदानकेंद्र अक्षरश: ओस पडली होती.

मात्र दुपारी चारच्या नंतर मुंबईकरांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. उत्तर मुंबई 52 , उत्तर पश्चिम मुंबई 50, उत्तर पूर्व मुंबई 53, उत्तर मध्य मुंबई 55, दक्षिण मध्य मुंबई 55, द. मुंबई 54, ठाणे 52, कल्याण 42, भिंवडी 43 मतदान झालं तर राज्यातील इतर मतदारसंघामध्ये नंदुरबार 62, धुळे 61, जालना 63, औरंगाबाद 59, जळगाव 56, रावेर 58, धुळे 61 आणि रायगडमध्ये 64 टक्के मतदान झालंय. राज्यात एकूण 338 मतदारांचा भवित्वव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं असून आता याचा फैसला 16 मे रोजीच कळणार आहे.

मुंबई अंतिम मतदान

मतदारसंघ    2014        2009

उत्तर मुंबई           52        43

उत्तर पश्चिम        50         44

उत्तर पूर्व              53         42

उत्तर मध्य          55         40

दक्षिण मध्य      55         39

दक्षिण मुंबई      54        40

 

राज्य अंतिम मतदान

मतदारसंघ         2014        2009

- ठाणे                    52         41

- कल्याण -          42         34

- पालघर -           60         48

- भिवंडी -            43         39

- रायगड -           64         56

- नाशिक -          60          45

- दिंडोरी -            64          48

- नंदुरबार -         62          53

- धुळे -                  61          43

- जळगाव -         56          42

- रावेर -               58          51

- औरंगाबाद -     59          52

- जालना -          63          56

 

यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी लवकरच मतदान केलं. दक्षिण मुंबईच्या ताडदेव भागात असलेल्या एसी मार्केट मतदान केंद्रावर पवारांनी मतदान केलं. याआधी पवार बारामतीत मतदान करायचे पण एमसीएच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी आपला कायमचा पत्ता मुंबईचा दिलाय. तर नाशिकमधले राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या पत्नी मीना भुजबळ आणि त्यांच्या सुनांनी नाशिक शहरात मतदान केलं. छगन भुजबळ यांचं नाव मुंबईतल्या माझगाव इथल्या मतदार यादीत आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी नाशिकमध्ये हक्क बजावला. आणि शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनीही मतदान केलं. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, मनसेचे प्रदीप पवार आणि गोडसे यांच्यात ही तिरंगी लढत होतेय.

तर औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत मतदान केलंय. औरंगाबादमध्ये खैरेंना काँग्रेसच्या नितीन पाटील आणि आपच्या सुभाष लोमटे यांनी आव्हान दिलंय. नंदुरबारमधल्या भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी मतदान केलं. त्यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांनी बंड केल्यामुळे इथली लढत लक्षवेधी ठरलीये. काँग्रेसचे तब्बल 9 वेळा खासदार असलेले माणिकराव गावित यांच्यासमोर हीना यांनी तगडं आव्हान उभं केलंय.

शिवसेनेचे ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांनीही मतदान केलं. ठाण्यात महायुतीकडून राजन विचारे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक, मनसेतर्फे अभिजीत पानसे आणि आप तर्फे संजीव साने निवडणूक लढवत आहे. एकनाथ शिंदेंचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे उमेदवार आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मतदान केलं. दक्षिण मध्य मुंबईमध्ये मनसेतर्फे आदित्य शिरोडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथे महायुतीतर्फे राहुल शेवाळे, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि आदित्य शिरोडकर यांच्यात लढत आहे. आणि आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी चेंबूरमध्ये मतदान केलं. मेधा पाटकर ईशान्य मुंबईतून आपतर्फे निवडणूक लढवतायत. ईशान्य मंुबईत मेधा पाटकर, भाजपचे किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत आहे.

सेलिब्रिटींना बजावला मतदानाचा हक्क

 सकाळीच सेलिब्रिटींना आपल्या मतदानाचा हक्क बजावला. उद्योगपती अनिल अंबानी,सुपरस्टार रजनीकांत, धर्मेंद्र, सनी देओल, अभिनेत्री सोनम कपूर, विद्या बालन, अमृता राव, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, शिल्पा शेट्टी, श्रेया घोसाल, टीव्ही स्टार रघू, कुणाल खेमू, डिनो मारिया, राहुल बोस आदी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2014 07:38 PM IST

ताज्या बातम्या