या उमेदवारांची आहे आज 'परीक्षा' !

या उमेदवारांची आहे आज 'परीक्षा' !

 • Share this:

maharastra_loksabha_election_mumbai_nasik_abad24 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशात सहाव्या आणि राज्यात तिसर्‍या टप्प्यासाठी 19 मतदारसंघामध्ये मतदान होतंय. त्यामध्ये मुंबईतल्या 6 मतदारसंघाचाही समावेश आहे. त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, ठाणे, या भागांत मतदान होतंय. मुंबईसह रायगड, नंदूरबार, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.

मुंबईतील लढत

मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर मध्य या ठिकाणच्या लढतीकडे विशेष लक्ष लागून आहे. यावेळी आम आदमी पक्ष नव्यानं निवडणूक लढवत आहे. या पक्षाच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसकडून मिलिंद देवरा, शिवसेनेकडून अरविंद सावंत, मनसेकडून बाळा नांदगावकर आणि आपकडून मीरा सन्याल रिंगणात आहेत. तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे, काँग्रेसचे इउमेदवार एकनाथ गायकवाड, मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर यांच्यात लढत आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये दुरंगी आणि दोन घराण्याची लढत आहे.

काँग्रेसकडून प्रिया दत्त आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन रिंगणात आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये काँग्रेसकडून गुरुदास कामत, शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर,आपकडून मयांक गांधी, मनसेकडून महेश मांजरेकर यांच्यात लढत आहेत.  उत्तर पूर्व मुंबईमध्ये तिरंगी लढत आहे. इथं राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील,भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आपकडून मेधा पाटकर निवडणूक लढवत आहे. अखेरील उत्तर मुंबईमध्ये दुरंगी लढत आहे. काँग्रेसकडून संजय निरुपम आणि भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांच्या लढत आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रभाव दिसून आला होता. आता यावेळी कोणाला बहुमत मिळणार हे पहावं लागणार आहे.

रायगडमधील लढत

तर दुसरीकडे रायगड लोकसभा मतदारसंघात उद्या 15 लाख 22 हजार मतदार 16 व्या लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी लागणारी सगळी यंत्रणा रायगडमध्ये सज्ज झाली आहेत. अवकाळी पावसाचा अंदाज पाहता ईव्हीएम मशिन्स नेण्यासाठी विशेष पॉलिथीन देण्यात येतंय. याठिकाणी राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे, शिवसेनेचे अनंत गीते, शेकापचे रमेश कदम आणि आपचे संजय अपरांती यांच्यात लढत होतेय. तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना या दोन मतदार संघात उद्या मतदान होतंय. मतदानाची प्रशासनानं जय्यत तयारी केलीये. मतदान यंत्रांचं वेगवेगळ्या केंद्रांवर वाटपही सुरू झालंय.

नाशिकमध्ये 2 लाख 43 हजार नावं मतदार मतदानाला मुकणार

नाशिकमध्येही उद्या मतदान होतंय. इथेही तयारीवर अखेरचा हात फिरवला जातोय. पण नाशिकमध्ये तब्बल 2 लाख 43 हजार नावं मतदार यादीतून वगळ्यात आली आहेत. मृत, दुबार आणि बदललेला पत्ता या कारणासाठी ही नाव वगळण्याचं जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आलंय. तर ज्यांची नावं मतदार यादीत नाहीत, त्यांनी आज दिवसभरात मतदान केंद्रावर जाऊन आपली नावं पुरवणी यादीत आहेत का ते तपासण्याचं आवाहन निवडणूक आयोगाने केलंय. विशेष म्हणेज नाशिकमधल्या दोन लक्षवेधी उमेदवारांचं मतदानच नाशिकमध्येच नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ नाशकातून उभे आहेत, पण त्यांचं मतदान माझगावमध्ये आहे. त्यामुळे ते पोस्टानं मतदान करणार आहे. तर दुसरे उमेदवार आपचे विजय पांढरे यांचं मतदान बुलढाण्याला आहे. त्यामुळे पांढरेही नाशिकमध्ये मतदान करणार नाहीत.

मुंबई मतदारसंघातील लढती

दक्षिण मुंबई

 • काँग्रेस- मिलिंद देवरा
 • शिवसेना- अरविंद सावंत
 • मनसे- बाळा नांदगावकर
 • आप- मीरा सन्याल

 दक्षिण मध्य मुंबई -

 • शिवसेना- राहुल शेवाळे
 • काँग्रेस- एकनाथ गायकवाड
 • मनसे- आदित्य शिरोडकर
 • आप- सुंदर बालकृष्णन -

 उत्तर मध्य मुंबई

 • काँग्रेस- प्रिया दत्त
 • भाजप- पूनम महाजन
 • समाजवादी पक्ष- फरहान आझमी

उत्तर पश्चिम मुंबई

 • काँग्रेस- गुरुदास कामत
 • शिवसेना- गजानन कीर्तीकर
 • आप- मयांक गांधी
 • मनसे- महेश मांजरेकर
 • राष्ट्रीय आम पार्टी -राखी सावंत

उत्तर पूर्व मुंबई

 • राष्ट्रवादी- संजय दिना पाटील
 • भाजप- किरीट सोमैया
 • आप- मेधा पाटकर

उत्तर मुंबई

 • काँग्रेस- संजय निरुपम
 • भाजप- गोपाळ शेट्टी

------------------------------------------------------------

राज्यातील 19 मतदारसंघातील लढती

------------------------------------------------------------

- नंदुरबार

 • माणिकराव गावित - काँग्रेस
 • डॉ. हीना गावित - भाजप

- धुळे

 • अमरीश पटेल - काँग्रेस
 • सुभाष भामरे - भाजप

- जळगाव

 • ए टी पाटील - भाजप
 • सतीश पाटील - राष्ट्रवादी

- रावेर

 • मनीष जैन - राष्ट्रवादी
 • रक्षा खडसे - भाजप
 • उल्हास पाटील - अपक्ष

- जालना

 • रावसाहेब दानवे - भाजप
 • विलास अवतडे - काँग्रेस
 • दिलीप म्हस्के - आप

- औरंगाबाद

 • चंद्रकांत खैरे - शिवसेना
 • नितीन पाटील - काँग्रेस
 • सुभाष लोमटे - आप

- दिंडोरी

 • हरिश्चंद्र चव्हाण - भाजप
 • डॉ. भारती पवार - राष्ट्रवादी

- नाशिक

 • छगन भुजबळ - राष्ट्रवादी
 • हेमंत गोडसे - शिवसेना
 • डॉ. प्रदीप पवार - मनसे

- पालघर

 • बळीराम जाधव - बहुजन विकास आघाडी
 • चिंतामण वनगा - भाजप
 • लाडक्या रूपा खरपडे -सीपीआय (एम)

- भिवंडी

 • विश्वनाथ पाटील - काँग्रेस
 • कपिल पाटील - भाजप
 • सुरेश म्हात्रे - मनसे
 • जलालुद्दिन अन्सारी - आप

- कल्याण

 • आनंद परांजपे - राष्ट्रवादी
 • श्रीकांत शिंदे - शिवसेना
 • नरेश ठाकूर - आप
 • प्रमोद पाटील - मनसे

- ठाणे

 • संजीव नाईक - राष्ट्रवादी
 • राजन विचारे - शिवसेना
 • अभिजित पानसे - मनसे
 • संजीव साने - आप

- रायगड

 • अनंत गीते - शिवसेना
 • सुनील तटकरे - राष्ट्रवादी
 • संजय अपरांती - आप

 

 

First Published: Apr 24, 2014 12:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading