ठाण्यात मतदारयादीतून तब्बल 6 लाख नावं वगळली

ठाण्यात मतदारयादीतून तब्बल 6 लाख नावं वगळली

  • Share this:

46nagpur_voting_issiue23 एप्रिल : पुणे, नाशिकनंतर आता ठाण्यातही मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचं समोर आलंय. लोकसभा निवडणुकीत ठाणे हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. पण ठाण्यात तब्बल 6 लाख 73 हजार मतदारांची नावं वगळण्यात आली असल्याचं उघड झालंय.

मात्र याद्यांच्या फेरनिरीक्षणांनंतर ही नावं वगळल्याचं ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांनी सांगितलंय. ठाणे जिल्ह्यात यंदा एकूण 72 लाख 70 हजार मतदार आहेत. यामध्ये 39 लाख पुरुष तर 33 लाख महिलांचा समावेश आहे. मतदार याद्यांसाठी एकूण 37 हजार कर्मचारी नेमलेले होते. उद्या ठाण्यात मतदान होतंय. मात्र लाखो मतदारांची नावं वगळल्यानं मतदार चांगलेच नाराज झालेत.

ठाणे जिल्ह्यातील पालघर मतदार संघातील स्त्री मतदार संख्या ७४,७४९८ तर पुरुष मतदारांची संख्या ८३,०२६०  तसेच इतर ७९  सैनिक मतदार २४० असे एकूण १५७८०७७ अशी आहे भिवंडी मध्ये ७५०९८५ स्त्री तर ९४५२०१ पुरुष मतदार असे एकूण १६९६५८४ तर कल्याण येथे ८,७६,४८५ स्त्री तर १०,४४,९३६ अशी एकूण १९,२२,०४८ इतकी मतदार संख्या आहेत तर ठाण्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या ९,३०,३६० तर पुरुष मतदार यांची संख्या ११ लाख ४२ हजार ० ६५ इतकी आहे तर सैनिक मतदार ७७६ इतकी आहे अशी एकूण २० ७३,२५२ इतकी संख्या आहे तर जिल्ह्यात स्त्री मतदारांची संख्या ३३,०५३३८ तर पुरुष मतदारांची संख्या ३९,६२४६२ इतकी आहे.

तसेच जिल्ह्यातील एकूण सैनिक मतदारांची संख्या १९०० अशी एकूण ७२,६९,९६१ इतकी आहे. पालघर मध्ये मतदान केंद्रांची संख्या २००२, भिवंडीत १९९०,कल्याण १८५६,ठाणे २१९७ अशी एकूण ८०४५ इतकी आहे. पालघर येथे ९९८१ भिवंडी येथे ८,८८६, कल्याण ९०२० तर ठाणे येथे ९,९१२ अशे एकूण ३७,७९९ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये ८८५० चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशे एकूण ४६,६४९ कर्मचारी असणार आहेत. जिल्ह्यासाठी एकूण २७५९ वाहने तसेच १५ हजार २४१ पोलीस कर्मचारी तसेच २१ तुकड्या अर्ध सैनिक दल तसेच ५ हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

तसेच जिल्ह्यात एकूण ३३३ गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात संशयित एकूण ८११ मतदान केंद्र आहेत पालघरमध्ये संशयित १६९ तर सूक्ष्म निरक्षकाची संख्या ५५ आहेत तर १११ व्हिडिओग्राफर ठेवण्यात येणार आहेत भिवंडीत संशयित २३८ तर सूक्ष्म निरीक्षक ९६ तर १३० व्हिडिओग्राफर १३०, कल्याण मध्ये १८१ संशयित मतदान केंद्र १८१ तर सूक्ष्म निरीक्षकांची संख्या ९० तर व्हिडिओग्राफरची संख्या ८६ इतकी आहे तर ठाण्यामध्ये २२३ संशयित मतदान केंद्राची संख्या आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात CCTV  देखील लावण्यात येणार आहेत.

First published: April 23, 2014, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading