Elec-widget

मी तसं काही बोललोच नाही -अजित पवार

  • Share this:

ajit pawar abad sot22 एप्रिल : बारामतीतल्या मासाळवाडी गावात अजित पवारांनी, सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करेन असं विधान केलं होतं. पण असं विधान आपण केलंच नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी पुन्हा एकदा दिलंय.

माझं डोकं फिरलंय का? मी असं काहीही म्हणालो नाही असा दावा अजित पवारांनी पुन्हा केलंय. तसंच अजित पवारांनी या प्रकरणाचं खापर मीडियावरच फोडलं.

त्यागावात असं काही घडलंच नाही. खुद्ध त्या गावचे गावकरी असं म्हणत आहे. पण माझा गावकर्‍यांवर दबाव असल्याचा आरोप केला जात आहे हा आरोप चुकीचा आहे असंही पवार म्हणाले. तसंच भाजप नेते चुकीचा प्रचार करतायत. विरोधी पक्ष नेते स्वत: मात्र आपल्या मतदार संघात स्वच्छ पाणी देऊ शकत नाही , असंही ते म्हणाले.

Loading...

भुसावळच्या रावेर मतदार संघात उमेदवार मनिष जैन यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या प्रकरणी पवारांनी ठाण्यात झालेल्या सभेत आपण चुकलोच नाही. आपण काहीही चुकीचं बोललो नाही असं म्हटलं होतं. याप्रकरणी अजित पवारांना अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार ऑडिओ टेपमध्ये

‘उद्याच्याला कुणी काही जरी गडबड केली तरी सुप्रियाला मी बाहेरच्याकडून निवडून आणेन… पण जर तुमच्या गावाने शब्द फिरवला तर इथलं पाणी सगळं मी बंद करेन. मी तुम्हाला आताच सांगतो… जर मासाळवाडी किंवा कुणी… तर मला मशीनमध्ये दिसेल, मी सरळ त्या लोकांना सांगेन की जर तुम्हाला अशी मस्ती आली तर मला तरी काय घेणं देणं आहे? शेवटी एका गावावरून माझी बहीण पडायची राहत नाही किंवा निवडून यायची राहत नाही.’

अजित पवारांचं  स्पष्टीकरण

“सुप्रिया सुळे यांची 15 तारखेला शेवटची सभा बारामतीमध्ये झाली. त्यानंतर 16 तारखेला प्रचारला बंद होता. त्यादिवशी सकाळपासून माझ्या मतदारसंघातील गावांच्या भेटीला होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जनतेच्या भेटी घेत होते. तर कुठून तरी माझ्या आवाजाची ऑडिओ प्रसिद्ध झाली. अजित पवार म्हणे गावाचं पाणीचं बंद करणार ? ज्या जनतेनं 25 वर्ष निवडून दिलं त्या गावाचं पाणी बंद केलं तर जनता मला घरी पाठवेल . मला काय तेवढी अक्कल नाही का ? पण काही नाही ऑडिओ क्लिप दाखवण्यात आली. व्हिडिओ क्लीप नाही. असल्या ऑडिओ क्लिप कुणीही बनवू शकतो. पण असं काही झालं नाही. माझ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. आपलं राज्य हे कायद्याचं राज्य आहे. मीही राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मला जी काही नोटीस येईल त्याला मी उत्तर देईन. पण आम्ही कधी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी चुकलोच नाही तर स्वत:ला दोषी कसं समजून घेईन ?” – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...