राम कदम यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

  • Share this:

Image mns_mla_ram_kadam_300x255.jpg22 एप्रिल : निवडणुकीच्या काळात राजकीय नेते काय करतील याचा काही नेम नाही. मनसेचे आमदार राम कदम यांनी गौतम बुद्धांचा अस्थिकलश आपल्या निवासस्थानी आणल्यावरून वाद निर्माण झालाय.

हा कलश आपण श्रीलंकेहून आणल्याचा दावा कदम यांनी केलाय. असा अस्थिकलश असणं शक्य नाही, तो बनावट अस्थिकलश आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघानं केलाय. राम कदम यांनी फसवणूक केली, असंही त्यांचं म्हणणं आहे.

या प्रकरणावरून भारिपच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या घरासमोर निर्दशनं केली. तेव्हा कदम यांच्या समर्थकांनी भारिपच्या कार्यकर्त्यांना मारहाणही केली.या प्रकरणी पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर राम कदम यांच्याविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी तीन कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आलीय.

First published: April 22, 2014, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading