21 एप्रिल : छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचे राजकीय संबंध फारसे चांगले नाहीत, हे सर्वांना माहित आहे. आपल्या सभांमध्ये राज ठाकरे नेहमीच भुजबळांवर टीका करतात, त्यांची नक्कलही करतात. कालच्या मुंबईतल्या सभेत राज ठाकरेंनी भुजबळांच्या वाढलेल्या संपत्तीचा मुद्दा उपस्थित केला. तर नाशिकच्या सभेत भुजबळही खूप आक्रमक झाले आणि राज ठाकरंवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. कोहिनूर मिलची जागा 420 कोटी रुपयाला विकत घ्यायला पैसा कुठून आणलेस, असा सवाल त्यांनी राजना केला. आपल्या सभेत ते सतत राज यांचा एकेरी उल्लेख करत होते.Follow @ibnlokmattv// !function(d,s,id){var js,fjsd.getElementsByTagName(s)[0],p/^http:/.test(d.location)?http:https;if(!d.getElementById(id)){jsd.createElement(s);js.idid;js.srcp://platform.twitter.com/widgets.js;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, script, twitter-wjs);// ]]>