Elec-widget

मी चुकलोच नाही, तर दोषी कसा ? -अजित पवार

  • Share this:

AJIT PAWAR SOt3419 एप्रिल : अजित पवार म्हणे गावाचं पाणीचं बंद करणार ? ज्या जनतेनं 25 वर्ष निवडून दिलं त्या गावाचं पाणी बंद केलं तर जनता मला घरी पाठवेल. मला काय तेवढी अक्कल नाही का? जर मी चुकलोच नाही तर स्वत:ला कसा दोषी समजून घेईन पण असं काही झालंच नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मासाळवाडी प्रकरणावर दिलं.

तसंच माझ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. मीही राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मला जी काही नोटीस येईल. त्याला मी योग्य उत्तर देईन. पण आम्ही कधी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला नाही असं अजित पवार म्हणाले. ठाण्यात झालेल्या प्रचारसभेत अजित पवारांनी आपल्यावरील सर्व फेटाळून लावले.

"सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करू" अशी धमकी अजित पवारांनी दिली असल्याचा एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. अजित पवारांनी या अगोदरही पाण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चांगलेच अडचणीत आले. आता पुन्हा एकदा अजितदादांनी पाण्यावरुन धमकी दिल्यामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादांची पाठराखण केली. त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत अशी बाजू शरद पवारांनी मांडली. दोन दिवस या प्रकरणावर राज्यभरात पडसाद उमटल्यानंतर अजित पवारांनी झालेल्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं.

सुप्रिया सुळे यांची 15 तारखेला शेवटची सभा बारामतीमध्ये झाली. त्यानंतर 16 तारखेला प्रचार बंद होता. त्यादिवशी सकाळपासून माझ्या मतदारसंघातील गावांच्या भेटीला होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जनतेच्या भेटी घेत होते. तर कुठून तरी माझ्या आवाजाची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली. अजित पवार म्हणे गावचं पाणीचं बंद करणार ? ज्या जनतेनं 25 वर्ष निवडून दिलं त्या गावाचं पाणी बंद केलं तर जनता मला घरी पाठवेल. मला काय तेवढी अक्कल नाही का ? पण काही नाही ऑडिओ क्लिप दाखवण्यात आली. व्हिडिओ क्लिप नाही. असल्या ऑडिओ क्लिप कुणीही बनवू शकतो. पण असं काही झालं नाही. माझ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. आपलं राज्य हे कायद्याचं राज्य आहे. मीही राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मला जी काही नोटीस येईल त्याला मी उत्तर देईन. पण आम्ही कधी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी चुकलोच नाही तर स्वत:ला दोषी कसं समजून घेईन ? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

दरम्यान, बारामती जिल्ह्यातील मासाळवाडी गावं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वादग्रस्त विधानामुळे चांगलंच चर्चेत आलं. ज्या गावावरुन हा वाद उफाळला. त्याच गावकर्‍यांनी आज (शनिवारी) मोर्चा काढून अजित पवारांनी धमकी दिली नाही असंच दाखवून दिलं. मासाळवाडीच्या ग्रामस्थांनी बारामतीमध्ये उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढत मासाळवाडी ग्रामस्थांनी अजित पवारांनी धमकावल्याचे आरोप फेटाळले. या मोर्चामध्ये मासाळवाडीतील अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा जास्त भरणा होता.

Loading...

काय म्हणाले होते अजित पवार ऑडिओ टेपमध्ये

‘उद्याच्याला कुणी काही जरी गडबड केली तरी सुप्रियाला मी बाहेरच्याकडून निवडून आणेन… पण जर तुमच्या गावाने शब्द फिरवला तर इथलं पाणी सगळं मी बंद करेन. मी तुम्हाला आताच सांगतो… जर मासाळवाडी किंवा कुणी… तर मला मशीनमध्ये दिसेल, मी सरळ त्या लोकांना सांगेन की जर तुम्हाला अशी मस्ती आली तर मला तरी काय घेणं देणं आहे? शेवटी एका गावावरून माझी बहीण पडायची राहत नाही किंवा निवडून यायची राहत नाही.’

अजित पवारांचं आता स्पष्टीकरण

"सुप्रिया सुळे यांची 15 तारखेला शेवटची सभा बारामतीमध्ये झाली. त्यानंतर 16 तारखेला प्रचारला बंद होता. त्यादिवशी सकाळपासून माझ्या मतदारसंघातील गावांच्या भेटीला होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जनतेच्या भेटी घेत होते. तर कुठून तरी माझ्या आवाजाची ऑडिओ प्रसिद्ध झाली. अजित पवार म्हणे गावाचं पाणीचं बंद करणार ? ज्या जनतेनं 25 वर्ष निवडून दिलं त्या गावाचं पाणी बंद केलं तर जनता मला घरी पाठवेल . मला काय तेवढी अक्कल नाही का ? पण काही नाही ऑडिओ क्लिप दाखवण्यात आली. व्हिडिओ क्लीप नाही. असल्या ऑडिओ क्लिप कुणीही बनवू शकतो. पण असं काही झालं नाही. माझ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. आपलं राज्य हे कायद्याचं राज्य आहे. मीही राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मला जी काही नोटीस येईल त्याला मी उत्तर देईन. पण आम्ही कधी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी चुकलोच नाही तर स्वत:ला दोषी कसं समजून घेईन ?" - अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2014 11:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...