Elec-widget

धमकी भोवली, अजित पवारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

  • Share this:

ajit pawar on munde19 एप्रिल : "सुप्रिया सुळेंना मत नाही दिलं तर गावंच पाणी बंद करू" अशी धमकी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलीच भोवली आहे. बारामती मतदारसंघातील मासाळवाडीच्या गावकर्‍यांना दिलेल्या धमकी प्रकरणी पवारांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुणे ग्रामीण पोलिसांनी पुढच्या कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल पाठवलाय. पण प्रचाराची वेळ संपल्यानंतरही अजित पवारांनी जाहीर सभा घेतल्याचं निष्पन्न झालेलं नाही. आपचे उमेदवार सुरेश खोपडे आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी पवारांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

एका व्हिडिओच्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. या व्हिडिओत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर पाणी बंद करू, असं गावकर्‍यांना धमकावल्याचं दिसतंय. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानंही राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केली असून त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं शरद पवार म्हणाले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2014 03:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...