S M L

परांजपेंनी दिल्या प्रचारासाठी काम करणार्‍यांना बनावट नोटा?

Sachin Salve | Updated On: Apr 18, 2014 04:30 PM IST

परांजपेंनी दिल्या प्रचारासाठी काम करणार्‍यांना बनावट नोटा?

8576anand_paranjpe_kalyan18 एप्रिल : दिल्ली गाठण्यासाठी अनेक उमेदवार प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे. पण कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी आपल्या प्रचारासाठी कामाला लावलेल्या माणसांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. प्रचारासाठी रोजंदारीवर घेतलेल्या महिलांचे पैसे बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. एवढंच नाहीतर महिलांना देण्यात आलेल्या मजुरीत बनावट नोटा असल्याचा आरोपही महिलांनी केला. मात्र परांजपेंनी हा आरोप फेटाळून लावला.

सभेसाठी गर्दी करण्यासाठी, घरोघरी पत्रक वाटण्यासाठी, पदयात्रेसाठी आणि परिसरात प्रचार करण्यासाठी महिलांनी त्यांचे काम 'इमाने इतबारे' केलं मात्र जेव्हा त्यांच्या हातात सात दिवसाच्या मजुरी ऐवजी तीनच दिवसांची मजुरी मिळाली आणि त्यातही नकली नोटा आल्या तेव्हा या महिला संतापल्या.

शिवाय काही 8 वी आणि 10 वीच्या वर्गात शिकणार्‍या मुलींनी आपल्या क्लासची फी भरण्यासाठी काही पैसे मिळतील या आशेनं सुट्टीच्या काळात परांजपेंसाठी प्रचाराचं कामं केली. विशेष म्हणजे परांजपे यांनी या मुली या मतदार नसल्याचे सांगून त्याना कामावर नेले होते. पण आपल्या कामाचे पैसे न मिळाल्यामुळे या मुलींना हेलपाटे मारावे लागत आहे.


याबाबत आनंद परांजपे यांनी आपण पक्षाबाहेरील कोणत्याही महिलांना रोजंदारीवर कामास ठेवले नसून आपल्याला तशी मुळीच गरज नाही असं सांगितलंय. तसंच हा माझ्या विरोधकांचाच डाव आहे असंही परांजपे म्हणाले. मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे मागील महिन्यात कल्याणमध्ये परांजपेंच्या कार्यकर्त्यांना रिक्षाचालकांना 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड वाटप करत असताना अटक करण्यात आली होती.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2014 04:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close