S M L

राहुल गांधी आज लातूरमध्ये, कल्पना गिरी हत्येप्रकरणी काय बोलणार?

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2014 02:55 PM IST

राहुल गांधी आज लातूरमध्ये, कल्पना गिरी हत्येप्रकरणी काय बोलणार?

rahul on kalpana giri13 एप्रिल :  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. दुपारी 3 वाजता त्यांची लातूरमध्ये सभा आहे. यावेळेला ते कल्पना गिरी खून प्रकरणावरून काय भूमिका घेतात त्याकडे स्थानिकांचं लक्ष आहे.

विशेष म्हणजे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गेल्या बुधवारी लातूरमधल्या सभेत कल्पना गिरी हत्याकांडावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे आता राहूलकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, 'आपल्या मुलीचा बळी काँग्रेसनं घेतला त्यामुळे आपण मतदानावर बहिष्कार घालत आहेत' असं कल्पना गिरीच्या आईवडीलांनी जाहीर केलंय.

राहुल गांधींना आपल्या पदाधिकर्‍यांच्या जाीवाचं मोल कळत असेल तर त्यांनी आमच्या घरी भेट द्यावी असं आवाहन कल्पना गिरीच्या आईवडीलांनी केली आहे..


 कल्पना गिरी हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम:

  • 21 मार्च - रंगपंचमीच्या दिवशी आमदार अमित देशमुख यांंच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडल्या
  • Loading...

  • 22 मार्च - MIDC पोलीस स्थानकात तिच्या पालकांनी कल्पना हरवल्याची तक्रार दाखल केली
  • 24 मार्च - तुळजापूर जवळच्या पाचुंगा तलावाजवळ कल्पनाचा मृतदेह सापडला
  • 28 मार्च - महेंद्रसिंग चौहान आणि संदीप किल्लारीकर या काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना अटक
  • महेंद्रसिंग चौहान - लातूर शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष
  • 30 मार्च - कल्पना गिरीचा मोबाईल आरोपी महेंद्रसिंग चौहानच्या शेतातल्या विहिरीत सापडला
  • 30 मार्च - याच दिवशी संदीप किल्लारीकरनं महेंद्रसिंग चौहान यानेच कल्पनाचा खून केल्याची कबुली दिली
  • 12 एप्रिल - श्रीरंग ठाकूर नावाच्या आणखी एका संशयिताला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2014 09:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close