कार्यकर्ते अडले, आता शरद पवारांच्याच सभेवर बहिष्कार?

कार्यकर्ते अडले, आता शरद पवारांच्याच सभेवर बहिष्कार?

  • Share this:

64rane_pawar12 एप्रिल : मतदानाची तारीख तोंडावर आली असताना सिंधुदुर्गात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणेंची डोकेदुखी चांगलीच वाढलीय. सावंतवाडीत जिल्हा राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकार्‍यांची कोअर कमिटीची बैठकही झाली.

पण या बैठकीत केसरकर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी निलेश राणे यांचा प्रचार न करण्यावर ठाम आहेत अशी माहिती मिळतेय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (रविवारी) सिंधुदुर्गात सभा होणार आहे पण या सभेलाही पदाधिकारी गैरहजर राहणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दिपक केसरकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पदाधिकार्‍यांच्या कोअर कमिटीची बैठक घेतली.

विशेष नारायण राणे यांनी नरमाईची भूमिका घेतलीय. आम्ही राज्यात आघाडीचा धर्म पाळू तुम्ही जिल्ह्यात पाळा असं आवाहनच राणेंनी केलं. सिंधुदुर्गातला तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गात आले होते. पण त्यांच्या सभेवरही कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला होता. तरीही राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा या असं आवाहन अजित पवारांनी केलं पण तरीही त्यांच्या आवाहनानंतरही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या इराद्यावर ठाम असल्याने काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आता उद्या खुद्ध शरद पवार सिंधुदुर्गात सभा घेणार आहे त्यामुळे कार्यकर्ते सभेला हजर राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

First published: April 12, 2014, 9:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading