राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकेना, अजितदादांच्याच सभेवर बहिष्कार

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकेना, अजितदादांच्याच सभेवर बहिष्कार

  • Share this:

89ajit pawar_sindhudurga11 एप्रिल : सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधला तिढा अजून सुटलेला नाहीय. आम्ही राज्यात आघाडीचा धर्म पाळू तुम्ही जिल्ह्यात पाळा असं सांगत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नरमाईची भूमिका घेतली पण स्थानिक नेत्यांची नाराजी दूर झालेली नाही.

एवढच नाहीतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेवर राष्ट्रवादी जिल्ह्याध्यक्षांसह इतर पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्ध अजित पवार सिंधुदुर्गात दाखल झाले. पण त्यांनाच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पण अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना आघाडीचा धर्म पाळण्याचं आवाहन केलंय.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी याच संदर्भात केसरकरांनी आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेटही घेतली. आता राणेंना पाठिंबा देण्यासंदर्भात उद्या चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. दरम्यान, सिंधुदुर्गचे काँग्रेस आमदार विजय सावंत यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सावंत यांनी राणेंवर केलेल्या आरोपांचं खंडन करावं नाहीतर दोन दिवसांत कारवाई करू असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला.

First published: April 11, 2014, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading