मुंबईसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबईसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध

  • Share this:

45377mumbai_aap10 एप्रिल : मुंबईत आम आदमी पक्षातर्फे मुंबई शहरासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. याआधी पक्षाचा राष्ट्रीय जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता.   लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यात यावं अशी आम आदमी पक्षाची भूमिका आहे.

स्थानिक प्रश्न लोकांना सोडवण्याचे अधिकार असला पाहिजे अशी भूमिका आपतर्फे मांडण्यात आलीय. त्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी जनलोकपाल विधेयक तयार करून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. धर्मनिरपेक्षता आणि जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणे हा एक महत्वाचा भाग आहे.

महिलांची सुरक्षितता तिला या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आलंय. कलम 377 ला या जाहीरनाम्यात विरोध करण्यात आलंय आणि एलबीटीलाही या जाहीरनाम्यात विरोध करण्यात आलाय. यावेळी मुंबईतले आपचे उमेदवार मयांक गांधी, मेधा पाटकर, मीरा संन्याल, सतीश जैन, फिरोझ पालखीवाला आणि सुंदर बालकृष्णन हे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

First published: April 10, 2014, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading