अमरावतीत तिरंगी : राणा विरुद्ध अडसूळ विरुद्ध देवपारे !

अमरावतीत तिरंगी : राणा विरुद्ध अडसूळ विरुद्ध देवपारे !

  • Share this:

rana vs adsul09 एप्रिल : शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ विरुद्ध राष्ट्रवादीच्या नवनीत राणा विरुद्ध बसपाचे गुणवंत देवपारेअशी तिरंगी लढत अमरावतीत होत आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक बंडखोर नेते संजय खोडके यांनी बसपाच्या उमेदवाराला सक्रीय पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजलीय. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात अजित पवार तर शेवटच्या टप्प्यात खुद्द शरद पवार अमरावतीत ठाण मांडून बसले आहेत.

एवढंच नाही तर नवनीत राणा यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी अजित पवारांनी त्यांचे विश्वासू आमदार संदीप बागेरिया यांच्यावर सोपवून 'खोडके इफेक्ट' कमी करण्याचा प्रयत्न केला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्येही नाराजी पसरल्यानं अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच स्थानिक सेना नेत्यांची मनधरणी करावी लागली. या मतदारसंघाचं सर्व गणित कुणबीबरोबरच दलित आणि मुस्लीम मतांवरही अवलंबून आहे. त्यामुळेच मतांची रस्सीखेच करण्याचा प्रयत्न आघाडी आणि महायुतीकडून होतोय.

आनंदराव अडसूळ- बलस्थानं

- राखीव मतदारसंघातल्या निवडणुकीचा अनुभव

- मूळचे सातारचे पण आधी बुलडाणा आणि नंतर अमरावतीमधून विजयी

- सहकार बँकिंग क्षेत्रातली पुण्याई कामात

- मातोश्रीचा आशीर्वाद

- कडवे शिवसैनिक

- मुलगा अभिजीत अडसूळ दर्यापूरचे आमदार

उणिवा

- मतदारसंघात उपरी उमेदवारी

- पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष

- स्थानिक सेना नेत्यांची नाराजी

- जनसंपर्काचा अभाव

नवनीत राणा- बलस्थानं

- ग्लॅमरस व्यक्तीमत्व

- महिला सक्षमीकरणाचं काम

- पती रवी राणा यांचा दांडगा जनसंपर्क

- रवी राणांच्या आमदारकीचा फायदा

- पवारांचा भक्कम पाठिंबा

उणिवा

- राजकारणाशी ओळख नाही

- पक्षसंघटनेत नवख्या

- अमरावती बाहेरच्या

- काँग्रेसच्या आमदारांचं सहकार्य नाही

गुणवंत देवपारे- बलस्थानं

- दलित उद्योजक उमेदवार

- आर्थिकदृष्ट्या भक्कम

- खोडकेंचा सक्रीय पाठिंबा

- खोडकेंमुळे प्रचारात आघाडी

उणिवा

- नागपूरस्थित उमेदवार

- विविध दलित गटांशी संपर्क नाही

X फॅक्टर

दलित मतांबरोबरच पावणे तीन लाख मुस्लीम मतांची भूमिका निर्णायक ठरणाराय. मोदी लाटेचा रिवर्स स्विंग पहायला मिळू शकतो. एकगठ्ठा मुस्लीम मतं राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2014 08:57 AM IST

ताज्या बातम्या