भ्रष्टाचारमुक्त स्थिर आणि कार्यक्षम सरकार, राष्ट्रवादीचा जाहीरनामा

भ्रष्टाचारमुक्त स्थिर आणि कार्यक्षम सरकार, राष्ट्रवादीचा जाहीरनामा

  • Share this:

Image sharad_pawar_on_fixing456346_300x255.jpg07 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपपाठोपाठ ऐन निवडणुकीच्या दिवशी मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा सादर करण्याचा चंग बांधलाय. राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा अधिकृतरित्या अजून प्रसिद्ध केला नाही. पण ऑनलाईन जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

या जाहीरनाम्यात विकासाभिमुख, पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त स्थिर आणि कार्यक्षम सरकार असं आश्वासन देत राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. तसंच भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि त्याविरोधातला लढा अधिक कार्यक्षमतेनं चालवण्यासंबंधीच्या योजनांना प्रोत्साहित करणे आणि बळकटी देणे असंही राष्ट्रवादीने स्पष्ट केलंय.

त्याचबरोबर स्वतंत्र तेलंगणाच्या धर्तीवर नव्या राज्यांच्या निर्मितीला पक्षाचा पाठिंबा असेल असंही राष्ट्रवादीने स्पष्ट केलं. प्रादेशिक भाषांसह इंग्रजी भाषेच्या विकासावर लक्ष केंदि्रत करणार, खाजगी क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देणार, गरिबांना कमी दरात घरं मिळावी यासाठी प्रयत्न करणार अशी आश्वसानंही देण्यात आलीय. लवकरच अधिकृतपणे हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय.

राष्ट्रवादीचा ऑनलाईन जाहीरनामा

- नव्या राज्यांच्या निर्मितीला पक्षाचा पाठिंबा

- विकासाभिमुख, पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त स्थिर आणि कार्यक्षम सरकार हे पक्षाचं घोषवाक्य

- भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि त्याविरोधातला लढा अधिक कार्यक्षमतेनं चालवण्यासंबंधीच्या योजनांना प्रोत्साहित करणे आणि बळकटी देणे

- प्रादेशिक भाषांसह इंग्रजी भाषेच्या विकासावर लक्ष केंदि्रत करणार

- खाजगी क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर

- गरिबांना कमी दरात घरं मिळावी यासाठी प्रयत्न करणार

- समान नागरी कायद्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही

- अल्पसंख्याक समाजासाठी वेगळे कायदे किंवा स्वतंत्र तरतुदी असाव्यात

- मात्र या तरतुदी घटनेच्या चौकटीत असाव्यात

First published: April 7, 2014, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading