मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाचा छापा

मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाचा छापा

  • Share this:

mutewar04 एप्रिल :  नागपुरातील काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवारांच्या 'ग्रेट नागरोड'च्या ऑफिसवर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी आज छापा टाकला आहे. या कार्यालयातून पैसे वाटले जात असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती . त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी काही वस्तू आणि लॉकर सील केले आहे.

दरम्यान, नितिन गडकरी यांच्या इशार्‍यावरून हा छापा टाकल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला आहे. अधिकारीच पैसे घेऊन आले होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ज्या ठिकानी छापा टाकला ते माझ्या मुलाचे व्यवसायचे ऑफिस असून निवडणूकीशी त्याचा संबंध नाही असंही ते म्हणाले. रात्री सील केलेलं लॉकर खुलं करून शहानिशा करावी अशी मागणीही त्यांनी केली.

First published: April 4, 2014, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading