एकदाचं 'दूध का दूध पानी का पानी' होऊ द्या - तटकरे

एकदाचं 'दूध का दूध पानी का पानी' होऊ द्या - तटकरे

  • Share this:

sunil tatkare27 मार्च : मला सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभं राहण्याचा कंटाळा आलाय. एकदाचं दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे अशा शब्दांमध्ये जलसंपदा मंत्री आणि रायगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला त्रागा व्यक्त केला.

आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्यावर आपली भूमिका मांडली. सिंचन घोटाळ्याप्रकरणी चितळे समितीने हजार पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यात अंतिम निष्कर्षासाठी समितीने 15 दिवसांची मुदत मागितली ती मुदतही संपली आणि त्यांना अहवालही सादर केला. शेवटी जनतेसमोर सत्य येईलच आणि ते यावंच अशी माझीही इच्छा आहे असं तटकरे म्हणाले.

एकादाचं काय ते दूध का दूध पाणी का पानी होऊ द्या, राजकीय जीवनात ते होण आवश्यक आहे. मलाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभं राहण्याचा कंटाळा आलाय आता सत्याच्या मार्गावर जनतेच्या समोरं जायचंय अशी भावना तटकरे यांनी व्यक्त केली. सुनील तटकरे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि सहकार्‍यांच्या नावे अनेक कंपन्या स्थापन केल्याचा आरोप आहे तसंच बोगस कंपन्या स्थापन करून रायगड जिल्ह्यात शेकडो एकर जमीन लाटल्याचाही आरोप आहे.

First published: March 27, 2014, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading