माणिकरावांचा पत्ता कट, मोघेंना उमेदवारी

माणिकरावांचा पत्ता कट, मोघेंना उमेदवारी

  • Share this:

shivajirao moghe21 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी दिलीय. असं करून काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना शह दिलाय, असं बोललं जातंय.

माणिकराव या मतदारसंघातून आपला मुलगा राहुल ठाकरे याला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतलं आपलं वजन वापरून मोघेंना उमेदवारी मिळवून दिली आणि माणिकरावांना धक्का दिला.

औरंगाबाद आणि नांदेडची उमेदवारी मात्र काँग्रेसने अजूनही जाहीर केलेली नाही. त्यामुळे या दोन मतदासंघातील उत्सुकता कायम आहे. नांदेडमधून काँग्रेस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना रिंगणात उतरवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

भास्करराव पाटील-खतगावकरांची माघार

विशेष म्हणजे, नांदेडचे काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार भास्करराव पाटील-खतगावकर यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेऊन आपण उमेदवारीच्या शर्यतीत नसल्याचं जाहीर केलं. नांदेडमधून यावेळी अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता यांची नावं चर्चेत आहेत. त्याचबरोबर खतगावकर सुद्धा उत्सुक होते.

पण, त्यांनी आज अचानक पत्रकार परिषद घेऊन आपण उमेदवारीच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या या खुलाशामुळे त्यांच्यावर दबाव आणला गेला का, अशी चर्चा सुरू झालीय. मात्र खतगावकर यांच्या माघारीमुळे अशोक चव्हाणांची एक अडचण दूर झाली असं बोललंय जातंय.

First published: March 21, 2014, 9:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading