'कृष्णकुंज'वारी सुरूच, धनंजय मुंडे राज भेटीला

'कृष्णकुंज'वारी सुरूच, धनंजय मुंडे राज भेटीला

  • Share this:

dhanjaya munde meet raj thakarey21 मार्च : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर जाऊन भेट घेतली. तब्बल दीड तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

मात्र या भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नसून ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी सांगितलं. बीडमधून भाजपचे उमेदवार असलेल्या काका गोपिनाथ मुंडे यांना निवडणुकीत धोबी पछाड मिळावा यासाठी ही 'राज' भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीडमध्ये मनसेने उमेदवार द्यावा अशी धनंजय मुंडे यांची मागणी होती. मात्र धनंजय मुंडे यांची ही मागणी मान्य झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. तर राष्ट्रवादीची मनसेसोबत अंतर्गत युती आहे का, अशी शंका येतेय असं वक्तव्य भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलंय.

(संग्रहित छायाचित्र)

First published: March 21, 2014, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading