कलमाडींचं दबावतंत्र, पत्नीला तरी तिकीट द्या !

कलमाडींचं दबावतंत्र, पत्नीला तरी तिकीट द्या !

  • Share this:

Image img_209412_kalmadi3_240x180.jpg21 मार्च : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेले सुरेश कलमाडी यांनी आपल्या होमटाऊन अर्थात पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्क वितर्क बांधले जात आहे. कलमाडींनी त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी यांना उमेदवारी न मिळाल्याने कलमाडी यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केलीये.

मला तिकीट न देणं समजू शकतो मात्र किमान माझ्या पत्नीला तिकीट मिळायला हवं होतं अशा शब्दांत कलमाडींनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय माझ्या समर्थकांपैकी केवळ 50 टक्केच कार्यकर्त्यांना मी भेटलोय आणखी निम्म्या कार्यकर्त्यांना 2 दिवसांत भेटून निर्णय जाहीर करेन असं अल्टीमेटमच पक्षाला दिलाय. तसंच सगळे पर्याय खुले असल्याचं सूचक विधानही कलमाडींनी केलंय. काही पक्ष संपर्कात आहेत मात्र भाजपनं अद्याप संपर्क साधलेला नाही असं सांगून कलमाडींनी उत्सुकता कायम ठेवली आहे.

सुरेश कलमाडींची पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठकीला 200 कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांसह आ.रमेश बागवे, उपमहापौर बंडू गायकवाड, माजी महापौर सतीश देसाई उपस्थित होते. कलमाडींवरची पक्षाने निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, कलमाडींची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना धावपळ सुरू झालीय. आज सकाळी हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात सुरेश कलमाडी यांची भेट घेतली. कलमाडींनी निवडणूक लढवू नये, काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा त्यांचा प्रचार करावा अशी मागणी पाटील यांनी केल्याचं कळतंय. आता कलमाडींनी पक्षाला दोनदिवसांचा अल्टीमेटम दिलाय दोन दिवसांत एक तर तुम्ही निर्णय घ्या अन्यथा मी निर्णय घेईल अशी भूमिकाच कलमाडींनी घेतल्याचं दिसतंय.

First published: March 21, 2014, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading