मावळ LIVE : पवार कुटुंबातील पहिला व्यक्ती पराभूत, बारणेंनी मारली बाजी

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 04:23 PM IST

मावळ LIVE : पवार कुटुंबातील पहिला व्यक्ती पराभूत, बारणेंनी मारली बाजी

मावळ, 23 मे : शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र हा मतदारसंघ चर्चेत आला तो राष्ट्रवादीच्या नव्या खेळीने. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार होते.

आज निकालाच्या सुरुवातीला पार्थ पवार पिछाडीवर होते. त्यानंतर त्यांनी आघाडीवर घेतली. पण अखेर पार्थ पवार यांचा 2 लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'पार्थ ज्या जागेवरून लढत होता, ती जागा आमची नव्हतीच. मागील दोन निवडणुकांत त्या जागेवर आमचा पराभव झाला होता. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी आम्ही पार्थला उभे करून प्रयोग करून बघितला,' अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितलं. पार्थ पवारांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली खरी, पण राष्ट्रवादीसाठी अगोदरचा इतिहास पाहता ही जागा प्रतिकूल मानली जाते. शरद पवारांनीही ही जागा अवघड असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी मुलाला या मतदारसंघातून उतरवणं ही मोठी रिस्क आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण अजित पवारांनी ही रिस्क घेण्यामागे काही गणितं असल्याचं पाहायला मिळत आहे.

अजित पवारांनी का घेतली रिस्क?

Loading...

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.

मागच्या निवडणुकीतील आकडेवारी, कुणाला किती मते मिळाली?

श्रीरंग बारणे (शिवसेना) - 5,12,223

लक्ष्मण जगताप (शेकाप) - 354,829

राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) - 182,293

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या मतदारसंघात पराभव झाला होता. राष्ट्रवादी आणि शेकापच्या मतांचं झालेलं विभाजन हे या पराभवाचं महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळेच याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून यावेळी दोन्ही पक्षांनी काळजी घेतली आहे. शेकापने राष्ट्रवादीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेकाप या पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास ती शिवसेनेपेक्षा जास्त ठरते.

शेकापसोबतची आघाडी आणि पिंपरी-चिंचवड भागात असेललं प्राबल्य, याच कारणामुळे अजित पवारांना आपण मुलाला विजयी करू शकतो, याबाबतचा विश्वास वाटला असावा.

मावळ लोकसभा मतदारसंघात येणार विधानसभा मतदारसंघ

पनवेल

कर्जत

उरण

मावळ

चिंचवड

पिंपरी

काय आहे सध्याची राजकीय स्थिती?

मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण ही लढाई आता श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण पार्थ पवार यांच्या रूपाने या मतदारसंघात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार उतरवला आहे. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या उमेवारीला पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नव्हे तर पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे गळदेखील घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शेकाप आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या मागे लावणार आहे.

अशावेळी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळमधील लढत चुरशीची ठरणार आहे.


VIDEO : पेपर चांगला गेला? प्रीतम यांच्याबद्दल पंकजांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 07:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...