EVM च्या मतदानात पराभव पण मतपत्रिकांमुळे विजय !

केरळमधल्या अर्नाकुलममध्ये पहिल्यांदा 1982 मध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यात आली. पण त्याबदद्ल प्रश्न उपस्थित करण्यात आले. मग सुप्रीम कोर्टाने मतपत्रिका वापरूनच मतदान घेण्याचे आदेश दिले.

Arti Kulkarni | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 07:07 PM IST

EVM च्या मतदानात पराभव पण मतपत्रिकांमुळे विजय !

नवी दिल्ली, 18 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदान यंत्रांमध्ये फेरफार, बिघाड यामुळे ही यंत्रं नेहमी चर्चेत असतात. पण ही काही नवी गोष्ट नाही. जेव्हा ही इलेक्ट्रॉनिक यंत्रं पहिल्यांदा वापरण्यात आली होती तेव्हाही त्यावर वाद झाले होते.

केरळमधल्या अर्नाकुलममध्ये पहिल्यांदा 1982 मध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यात आली. पण त्याबदद्ल प्रश्न उपस्थित करण्यात आले. मग सुप्रीम कोर्टाने मतपत्रिका वापरूनच मतदान घेण्याचे आदेश दिले.

केरळमध्ये इव्हीएम वापरले तेव्हा त्यासाठी संसदेची मंजुरीही घेतली नव्हती. अर्नाकुलममध्ये 50 मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात आलं. EVM मुळे मतदान वेगाने झालं आणि गणतीसाठीही कमी वेळ लागला.

काँग्रेसचा आक्षेप

इथे सीपीआयच्या सिवन पिल्लई यांना 30 हजार 450 मतं मिळाली तर काँग्रेसचे एसी जोस यांना 30 हजार 327 मतं मिळाली. सिवन पिल्लई यांनी फक्त 123 मतांनी एसी जोस यांना हरवलं होतं. पण इथे काँग्रेसने पराभव पत्करायला नकार दिला. काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या तंत्राला आक्षेप घेतला. संसदेच्या मंजुरीशिवाय ही यंत्रं इथे वापरात आणली, असा आरोप करत जोस यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

Loading...

EVM वर बंदी

हायकोर्टाने मात्र जोस यांची याचिका फेटाळली. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने इथे मतपत्रिकांच्या आधारे निवडणूक घेण्याचे आदेश दिले. यानंतर जोस यांना 2 हजार मतं जास्त मिळाली. या प्रकरणानंतर निवडणुकीमध्ये EVM वापरायला सुप्रीम कोर्टाने बंदी घातली.

यानंतर 1992 मध्ये संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मतदानात इलेक्ट्रॉनिक यंत्रं वापरली जाऊ लागली. 1998 नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही EVM चा सर्रासपणे वापर झाला.

==================================================================================================================================================================

VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...