महाराष्ट्र LIVE : आघाडीच्या सेनापतींना मोठा धक्का; चव्हाण पिछाडीवर, मावळमध्ये निराशा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 11:04 AM IST

महाराष्ट्र LIVE : आघाडीच्या सेनापतींना मोठा धक्का; चव्हाण पिछाडीवर, मावळमध्ये निराशा

मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसताना दिसत आहे. नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत.

नांदेड - अशोक चव्हाण 5448 मतांनी पिछाडीवर

भाजपा - 54552

काँग्रेस - 49104

वंचित - 15243

Loading...

फेरी 11 वी

पार्थ पवार पिछाडीवर

सुरुवातीला पार्थ पवार पिछाडीवर होते. त्यानंतर त्यांनी आघाडीवर घेतली. पण आता ताजा कल हाती आला तेव्हा पार्थ पवार हे 54 हजारांनी पिछाडीवर आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितलं. पार्थ पवारांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली खरी, पण राष्ट्रवादीसाठी अगोदरचा इतिहास पाहता ही जागा प्रतिकूल मानली जाते. शरद पवारांनीही ही जागा अवघड असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी मुलाला या मतदारसंघातून उतरवणं ही मोठी रिस्क आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण अजित पवारांनी ही रिस्क घेण्यामागे काही गणितं असल्याचं पाहायला मिळत आहे.

अजित पवारांनी का घेतली रिस्क?

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.

मागच्या निवडणुकीतील आकडेवारी, कुणाला किती मते मिळाली?

श्रीरंग बारणे (शिवसेना) - 5,12,223

लक्ष्मण जगताप (शेकाप) - 354,829

राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी) - 182,293

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या मतदारसंघात पराभव झाला होता. राष्ट्रवादी आणि शेकापच्या मतांचं झालेलं विभाजन हे या पराभवाचं महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळेच याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून यावेळी दोन्ही पक्षांनी काळजी घेतली आहे. शेकापने राष्ट्रवादीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेकाप या पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास ती शिवसेनेपेक्षा जास्त ठरते.

शेकापसोबतची आघाडी आणि पिंपरी-चिंचवड भागात असेललं प्राबल्य, याच कारणामुळे अजित पवारांना आपण मुलाला विजयी करू शकतो, याबाबतचा विश्वास वाटला असावा.


VIDEO : अब की बार..., भाजपसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 11:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...