कोरोनाच्या (Covid-19) या काळात आरोग्याची (Health) काळजी महत्त्वाची आहे. रोगप्रतिकारशक्ती (Immune System) वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या (Green Vegetables) खूप फायदेशीर आहेत. जेवणामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश खूप महत्त्वाचा आहे. पचनसंस्था चांगली ठेवण्याचं काम देखील या भाज्या करतात. जुकीनी (Zucchini) ही भाजी आरोग्याला चांगली असण्याबरोबरच तिच्यात औषधी गुणधर्म (Medicinal Values) देखील आहेत. Webmd च्या माहितीनुसार ही भाजी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून आज आपण याच भाजीचे फायदे जाणून घेणार आहोत.
1)वजन कमी करण्यात फायदेशीर
या भाजीमध्ये अधिक फायबर (Fiber) असल्याने तुम्ही ही भाजी खाल्यानंतर खूप वेळ भूक लागत नाही. यामुळे तुम्ही अतिरिक्त खाण्याचे टाळल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहील. ही भाजी तुम्ही दररोज जेवणात खाऊ शकता याचबरोबर सूप करून देखील याचे सेवन करू शकता.
2)हृदय आरोग्यपूर्ण राहते
जुकीनी (Zucchini) खाणे हृदयासाठी (Heart) देखील फायदेशीर आहे. जुकीनीमधील बीटा-कैरोटीन या पोषक तत्वांमध्ये अँटिऑक्सिडंट आढळतात. यामुळे हृदयाला(Heart) याचा फायदा होतो. हृदयाचे आरोग्य आणि वयोमान वाढवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये जुकीनीचा (Zucchini) समावेश करावा.
3)डोळ्यांसाठी देखील उपयुक्त
वयोमानानुसार डोळ्यांची (Eyes) दृष्टी कमी होत जाते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य योग्य राहण्यासाठी आणि दीर्घकाळ स्पष्ट दिसण्यासाठी आहारात जुकीनीचा (Zucchini) समावेश करावा. डोळ्यांचा प्रकाश दीर्घकाळ टिकण्यासाठी व्हिटॅमिन्स(Vitamins) असलेल्या भाज्यांचे सेवन करावे.
4)डायबिटीज नियंत्रणात राहते
या भाजीमध्ये कार्बोहायड्रेटेड(Carbohydrates) मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रक्तामध्ये साखर(Sugar) नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
5)कोलेस्ट्रॉल कमी होते
या भाजीमध्ये अधिक फायबर असल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholestrol) नियंत्रणात राहते. यामुळे तुमचे वजन आणि चरबी देखील वाढत नाही.
6)पचनसंस्था सुधारते
या भाजीमध्ये अधिक फायबर असल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. याचबरोबर पॉट साफ राहण्यास देखील मदत होते. जुकीनीचा कोलेस्ट्रॉल आहारात समावेश केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसून येईल.
7)रोग प्रतिकारकशक्ती वाढते
जुकीनीमध्ये कोलेस्ट्रॉल असलेल्या पोषक तत्त्वांमुळे रोग प्रतिकारकशक्ती(Immunity) वाढण्यास मदत होते. याचबरोबर यातील औषधी गुणधर्मांमुळे विविध आजारांपासून देखील तुमचे संरक्षण होते.