मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

टेक्नॉलॉजीची कमाल! जीव वाचवता वाचवता 'बिछडे यार'; 70 वर्षांनी पुन्हा झाली भेट

टेक्नॉलॉजीची कमाल! जीव वाचवता वाचवता 'बिछडे यार'; 70 वर्षांनी पुन्हा झाली भेट

सध्या कोरोना काळात प्रत्येक जण एकमेकांशी टेक्नॉलॉजीने जोडून राहिलेला आहे आणि याच टेक्नॉलॉजीने कित्येक वर्षांनी अनेकांच्या भेटीगाठीही घडवल्या आहेत.

सध्या कोरोना काळात प्रत्येक जण एकमेकांशी टेक्नॉलॉजीने जोडून राहिलेला आहे आणि याच टेक्नॉलॉजीने कित्येक वर्षांनी अनेकांच्या भेटीगाठीही घडवल्या आहेत.

सध्या कोरोना काळात प्रत्येक जण एकमेकांशी टेक्नॉलॉजीने जोडून राहिलेला आहे आणि याच टेक्नॉलॉजीने कित्येक वर्षांनी अनेकांच्या भेटीगाठीही घडवल्या आहेत.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 23 ऑक्टोबर  : "मी माझ्याच मनात म्हटलं साशा? मला माहीत होतं की जगात अनेक इसनबर्ग आहेत, पण साशा इसनबर्ग? ते कसं शक्य आहे?", ZOOM MEET वर आयोजित प्रार्थनासभेत अमेरिकेत राहणाऱ्या  83 वर्षांच्या रुथ बँडस्पीलगल यांनी साशा इसनबर्ग नाव ऐकल्यानंतर त्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर केलं. त्यांनी लगेच आपल्याला आपला मुलगा लॅरीला बोलवलं आणि हा साशा इसनबर्ग नेमका कोण याची चौकशी करायला सांगितलं. लॅरीने इसनबर्गच्या कुटुंबाला फोन केला आणि रूथ यांचा विचार खरा ठरला. हा तोच साशा इसनबर्ग रूथ यांचा बालमित्र. तब्बल 70 वर्षांनी रूथ यांच्या कानावर त्याचं नाव पडलं आणि ताटातूट झालेले हे मित्र-मैत्रीण 7 दशकांनी भेटले.

नाझी जर्मनीने ज्यावेळी ज्यूंचं हत्याकांड केलं, ज्याला होलोकॉस्ट म्हटलं जातं. त्याचवेळी रुथ आणि साशा या दोघांचीही कुटुंबं जवळ आली आणि नंतर त्यांची ताटातूटही झाली होती. तब्बल 70 वर्षांनी झूम मीटवरील ऑनलाइन कार्यक्रमामुळे ही दोन्ही कुटुंबं पुन्हा ऑनलाईन भेटू शकली. कोरोना महासाथीमुळे ज्युंच्या योम किप्पुर सणानिमित्त सिनेगॉगने आयोजित केलेल्या ऑनलाइन सेवेमुळे हे मित्र-मैत्रीण भेटू शकले आणि हे त्यांच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.

79 वर्षांचे साशा म्हणाले, "मला माहीत नव्हतं की रेगिना अमेरिकेत आहे. आता 70 वर्षे उलटली आहेत मी तेव्हा लहान होतो. त्यामुळेच मला हा चमत्कार वाटतो आहे. कारण कोरोना महासाथीमुळे एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम ऑनलाइन होईल आणि असं काही जुळून येईल असं वाटलंही नव्हतं. रेगिना हे रूथचं मूळ नाव. अमेरिकेत गेल्यानंतर तिनं आपलं नाव बदललं.

हे वाचा - वैष्णो देवीला निघाल्या सायकलस्वार आजी; VIDEO पाहून म्हणाला, जय माता दी!

रूथ यांचा जन्म 1936 मध्ये सीचानोव्हमध्ये झाला. 1939 मध्ये जग दुसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभं असताना हिटलर पोलंडमध्ये घुसल्यानंतर रूथ यांचं कुटुंब पोलंडमधून युक्रेनला गेलं आणि नंतर त्यांना सर्बियातील कामगारांच्या छावण्यांत पाठवण्यात आलं. युद्ध संपल्यानंतर ते पुन्हा पोलंडला आले आणि ज्यु संघटनांच्या मदतीने 1946 मध्ये ऑस्ट्रियातील विस्थापितांच्या छावणीत राहिले. रूथ आणि साशा हे पोलंडमधील एकाच गावातील रहिवाशी.  तिथंच रूथ आणि साशा यांची मैत्री झाली.

साशाच्या वडिलांचं 1948 मध्ये कार अपघातात निधन झालं होतं. त्यावेळी रूथ यांच्या वडिलांनी केलेलं सांत्वन आणि दिलेला आधार साशा यांच्या अजूनही लक्षात आहे. ते म्हणाले, "रूथचे वडील खूपच सात्विक आणि धार्मिक होते. माझ्या दु:खाच्या काळात त्यांनी मला आधार दिला. माझे वडील गेले तेव्हा काद्दिश ही मृतांसाठी म्हटली जाणारी प्रार्थनाही माझ्यासोबत केली होती. अशा आठवणी तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यामुळे या भेटीने मी खूप भावुक झालो आहे आणि माझ्या डोळ्यांत अश्रूही आलेत.’

"आम्ही आधीपासूनच एका कुटुंबासारखे होतो. हिब्रूत कुटंबाला मिशपाचा म्हणतात", असं रूथ म्हणाल्या.

त्यानंतर या कुटुंबांची आणि या दोन मित्र-मैत्रिणीची ताटातूट झाली. त्यांनी 1949 साली शेवटचं एकमेकांना पाहिलं होतं.

हे वाचा - छोटंसं पण टकाटक; फक्त भारतच नाही तर आशियातलं सर्वात स्वच्छ सुंदर असं गाव

साशा  1964 मध्ये आपल्या आईसोबत ब्रूकलीनला आले. तिथं कष्ट करून त्यांनी इंग्रजी आणि नंतर आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं. पत्नी आणि अलिसा, केविन ही दोन मुलं असं त्याचंं कुटुंब. तर रूथ यांचं कुटुंब 1952 मध्ये फिलाडेल्फियात स्थायिक झालं. रूथ यांचं 1957 मध्ये लग्न झालं. त्यांना प्लोरा, डेबी आणि लॅरी अशी तीन मुलं.

रुथ आणि साशा दोघंबी अमेरिकेत एकमेकांपासून 60 मैलांच्या अंतरावर राहत होते. तब्बल 70 वर्षांनी त्यांची भेट झाली ती ऑनलाइन. ज्याचा आनंद त्यांना भरपूर झाला मात्र प्रत्यक्ष एकमेकांना भेटता आलं नाही, ही खंतही त्यांच्या मनात राहिली. मात्र काही का असेना. टेक्नॉलॉजीने व्हर्च्युअली का होईना हा बिछडलेल्या यारांची भेट घडवून दिली.

First published:

Tags: Techonology