मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Alert! कोरोनापेक्षाही महाभयंकर Zombie Virus पसरतोय; खरंच प्रत्यक्षात माणसं झॉम्बी बनणार?

Alert! कोरोनापेक्षाही महाभयंकर Zombie Virus पसरतोय; खरंच प्रत्यक्षात माणसं झॉम्बी बनणार?

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Netflix/screen grab)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Netflix/screen grab)

प्राण्यांमध्ये सापडलेला झॉम्बी व्हायरस माणसांमध्येही पसरू शकतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

    उटावा, 06 एप्रिल : झोम्बी तुम्हाला माहितीच असतील. फिल्ममध्ये तुम्ही झोम्बींना पाहिलं असेल. झोम्बी बनलेली माणसं दुसऱ्या माणसांवर तुटून पडतात. मग इतर माणसंही झोम्बी बनतात. फिल्ममधील झोम्बींना पाहून तुम्हीही कधीतरी झोम्बीची अॅक्टिंगही केली असेल. पण आता प्रत्यक्षातही माणसांना झोम्बी बनवेल असा व्हायरस पसरतो आहे (Zombie Virus). त्यामुळे आता चिंता वाढली आहे. कोरोनाव्हायरसनंतर (CoronaVirus) आता झोम्बी व्हायरसचा धोका आहे. सध्या हा व्हायरस हरणांमध्ये सापडला आहे (Zombie Virus In Deers). कॅनडातील हरणांना झोम्बी व्हायरसची लागण झाली आहे (Zombie Virus In Canada) . VICE World News च्या रिपोर्टनुसार हरणांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरते आहे. या व्हायरसची लागण झालेलं हरण दुसऱ्या हरणांची शिकार करून त्यांना आपलं भक्ष्य बनवत आहे. कॅनडातील काही भागात याला क्रोनिक वेस्टिंग डिसीज म्हणून घोषित करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाचे वाइल्डलाइफ स्पेस्लिस्ट मार्गो पिबस यांनी सांगितलं की ही महासाथ हरणांमध्ये वेगाने पसरते आहे. हे वाचा - ब्युटी प्रोडक्टऐवजी 'त्या' Men Products च्या जाहिरातीसाठी उतावळी महिला; धक्कादायक आहे कारण CWD ने हरणांमधील हा व्हायरस इतर प्राणी किंवा इतर माणसांमध्येही पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. माणसांना या व्हायरसची लागण फक्त प्राण्याचं मांस खाल्ल्याने नाही तर प्राण्याची लघवी, लाळ, थूंक याच्या संपर्कात आल्यानेही होऊ शकतो.  या व्हायरसची लागण झाल्यास माणसांमध्ये डायरिया, डिप्रेशन आणि लकवा मारल्यासारखी लक्षणं दिसू शकतात. सुदैवाने अद्याप माणसांमध्ये या व्हायरसची लागण झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. हे वाचा - वारंवार बोटं मोडण्याची सवय चांगली नाही, म्हातारपणात हातात वस्तू धरणंही होईल अवघड कॅनडात हा आजार सर्वात आधी 1996 सालीसुद्धा आढळला होता. एका फार्ममध्ये हा व्हायरस पसरला. त्यानंतर इतर प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरत गेला. त्यानंतर या सर्व प्राण्यांना मारण्यात आलं. जेणेकरून इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवता येईल. बॅक्टेरिया आणि इतर व्हायरसची जेनेटिक माहिती मिळू शकते पण हरणांमध्ये पसरणाऱ्या या व्हायरसबाबत माहिती मिळणं शक्य नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Canada, Health, Lifestyle, Rare disease, Serious diseases

    पुढील बातम्या