मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हृतिक-कतरिनापासून हिंदीच्या आग्रहापर्यंत, Zomato सारखं पडतं वादात! वारंवार का मागावी लागते माफी?

हृतिक-कतरिनापासून हिंदीच्या आग्रहापर्यंत, Zomato सारखं पडतं वादात! वारंवार का मागावी लागते माफी?

तमिळनाडूमधल्या एका ग्राहकाला हिंदी भाषा (Hindi Language) येत नसल्याचं कारण देऊन त्याला रिफंड दिला गेला नाही आणि Zomato विरोधात तमीळ जनतेनंं रान उठवलं. यापूर्वीही झोमॅटोला अनेक वेळा माफी मागावी लागली आहे.

तमिळनाडूमधल्या एका ग्राहकाला हिंदी भाषा (Hindi Language) येत नसल्याचं कारण देऊन त्याला रिफंड दिला गेला नाही आणि Zomato विरोधात तमीळ जनतेनंं रान उठवलं. यापूर्वीही झोमॅटोला अनेक वेळा माफी मागावी लागली आहे.

तमिळनाडूमधल्या एका ग्राहकाला हिंदी भाषा (Hindi Language) येत नसल्याचं कारण देऊन त्याला रिफंड दिला गेला नाही आणि Zomato विरोधात तमीळ जनतेनंं रान उठवलं. यापूर्वीही झोमॅटोला अनेक वेळा माफी मागावी लागली आहे.

  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: झोमॅटो (Zomato) ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तमिळनाडूमधल्या एका ग्राहकाला हिंदी भाषा (Hindi Language) येत नसल्याचं कारण देऊन त्याला रिफंड दिला गेला नाही. त्यानंतर तमिळनाडूमध्ये याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात आला. कंपनीनं झाल्या प्रकाराबाबत माफीदेखील मागितली. झोमॅटो वादात (zomato controversy) सापडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. या अगोदरदेखील विविध कारणांवरून कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली आहे. यापूर्वी कंपनीला हृतिक आणि कतरिनासोबत केलेल्या जाहिरातीसाठी सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. ATM मधून फाटक्या नोटा आल्या? अशा मिळतील बदलून, वाचा सविस्तर एवढंच नाही, तर झोमॅटो डिलिव्हरी बॉयबाबत (Zomato Delivery Boy) एक वादग्रस्त प्रकरणदेखील समोर आलं होतं. ते अनेक दिवस माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलं होतं. झोमॅटो यापूर्वी कधी आणि का वादात सापडली होती, याची ही माहिती. हृतिक आणि कतरिनासोबत केलेल्या जाहिराती (2021) काही दिवसांपूर्वी झोमॅटोनं हृतिक रोशन आणि कतरिना कैफला घेऊन दोन जाहिराती केल्या होत्या. एका जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं आहे, की भर पावसातही जेवणाचं पार्सल वेळेवर वितरित केल्याबद्दल हृतिक रोशन (Hrithik roshan) डिलिव्हरी बॉयचं कौतुक करतो आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त करतो. हृतिक फोन आणण्यासाठी आत जातो; मात्र त्याच वेळी डिलिव्हरी बॉयला पुढची ऑर्डर मिळते आणि तो सेल्फी क्लिक न करताच निघून जातो. कुत्रा माणसाला चावला, मग माणूस कुत्र्याला चावला!आणि मग... अशीच एक जाहिरात कतरिना कैफचीही (Katrina kaif) आहे. तिच्या वाढदिवशी डिलिव्हरी बॉय एकदम वेळेवर तिला केकची ऑर्डर नेऊन देतो. ती त्याला केक खाण्याची विनंती करते. केक आणण्यासाठी ती जेव्हा घरात जाते, तेव्हा डिलिव्हरी बॉयला पुढच्या ऑर्डरसाठी जावं लागतं. या जाहिरातींनंतर कंपनीवर नागरिकांनी आरोप केला होता, की आपल्या डिलिव्हरी बॉइजना चांगला पगार देण्याऐवजी कंपनी बॉलिवुड सेलिब्रेटींना घेऊन जाहिराती करण्यावर पैसे खर्च करत आहे.

  चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? या उपायांनी मिळवा परत

   तसंच, त्यांना दोन ऑर्डर्समध्ये इतका थोडा वेळही मिळत नसल्याचं जाहिरातीतून कळत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. याबाबत कंपनीला एक निवेदन काढावं लागलं होतं. डिलिव्हरी बॉइज आमचे हिरो आहेत. त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, हे सांगण्याच्या हेतूनं आम्ही जाहिराती केल्या, असं कंपनीनं स्पष्ट केलं होतं. शिवाय आमचा प्रत्येक ग्राहक स्टार असल्याचंदेखील कंपनीने स्पष्ट केलं होतं.
  डिलिव्हरी बॉयनं मारहाण केल्याचा आरोप (मार्च 2021) या वर्षी मार्च महिन्यात बेंगळुरूमध्ये कंपनीविरोधात एक प्रकरण नोंदवलं गेलं होतं. एका महिलेनं झोमॅटोच्या अॅपवरून जेवण ऑर्डर केलं होतं; पण डिलिव्हरीसाठी उशिर होत असल्यानं तिनं ऑर्डर रद्द केली. असं असूनही, डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन आला. त्यानंतर ती महिला आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद झाला. महिलेनं डिलिव्हरी बॉयवर आरोप केला होता, की जेवण घेण्यास नकार देताच डिलिव्हरी बॉयने नाकावर बुक्की मारली होती. या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता; मात्र नंतर या प्रकरणात महिलाच दोषी असल्याचं निष्पन्न झालं होतं. झोमॅटोच्या एमसी-बीसी जाहिरातीनं उडाली होती खळबळ (2017) 2017 मध्ये झोमॅटोने आपल्या जाहिरातीत एमसी आणि बीसी हे शब्द वापरले होते. हे दोन्ही शॉर्टफॉर्म शिवी म्हणून वापरतात. त्यामुळे कंपनीला सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागलं होतं. कंपनीची जाहिरात घृणास्पद असून याबद्दल माफी मागण्याची सूचना नागरिकांनी केली होती. त्यानंतर कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी जाहीरपणे माफी मागितली होती. झोमॅटोनं प्रमोशनसाठी एमसी आणि बीसी हे शब्द वापरले होते. कंपनीच्या दृष्टीने एमसी आणि बीसीचा फुलफॉर्म 'मेक अँड चीज आणि बटर चिकन' असा असल्याचं स्पष्टीकरण गोयल यांनी दिलं होतं. त्यानंतर ही जाहिरात सर्व माध्यमांवरून काढून घेण्यात आली होती. याशिवाय अनेकदा लहान-मोठ्या कारणांवरून झोमॅटो वेळोवेळी वादात सापडलेली आहे. अनेकदा कंपनीला नागरिकांची आणि आपल्या ग्राहकांची माफीदेखील मागावी लागली आहे.
  First published:

  Tags: Tamil nadu, Zomato

  पुढील बातम्या