राशींचं ‘नोकरी कनेक्शन’, जाणून घ्या कोणत्या राशीला मिळते चांगली नोकरी

दोन्ही राशींमध्ये स्वामी बुध देव असतो. ज्योतिषशास्त्रात बुधला बुद्धीचा घटक मानण्यात आलं आहे. या दोन्ही राशीची माणसं सहसा उच्च पदांवर काम करताना दिसतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 06:53 AM IST

राशींचं ‘नोकरी कनेक्शन’, जाणून घ्या कोणत्या राशीला मिळते चांगली नोकरी

चांगल्या नोकरीबद्दल बोलायचे झाले तर 12 राशींमध्ये मिथून आणि कन्या या दोन राशी आहेत ज्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. या दोन्ही राशींमध्ये स्वामी बुध देव असतो. ज्योतिषशास्त्रात बुधला बुद्धीचा घटक मानण्यात आलं आहे. या दोन्ही राशीची माणसं सहसा उच्च पदांवर काम करताना दिसतात.

मकर, कुंभ आणि तुळ रास- मकर आणि कुंभ राशीचे स्वामी शनीदेव असतात. या दोन्ही राशींवर शनीचा प्रभाव असतो. या राशीचे लोक न्यायप्रिय असतात. या गुणांमुळे या राशीच्या लोकांनी न्याय, शिक्षा आणि राजकारणात करिअर केलं तर त्यांना नक्कीच उच पद मिळेल. तर तुळ राशीच्या लोकांनी कला क्षेत्रात आपलं करिअर केलं तर त्यांना यश नक्की मिळू शकतं.

मेष, वृषभ आणि कर्क रास- मेष राशीच्या लोकांना कला, शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांसाठी बँकिंग, चिकित्सा, शिक्षण आणि बांधकाम क्षेत्रात चांगलं करिअर होऊ शकतं. तर कर्क राशीच्या लोकांनी मॅनेजमेन्ट, पत्रकारिता आणि कॉम्प्युटर क्षेत्रात करिअर करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.

सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन- सिंह राशीचे लोक करिअरमध्ये फार यशस्वी होतात. धनु राशीच्या लोकांनी शिक्षण, वैज्ञानिक, संशोधन क्षेत्रात करिअर करावं. तर मीन राशीच्या लोकांनी राजकारण आणि न्याय क्षेत्रात करिअर केले तर त्यांना चांगलं यश मिळतं. तर वृश्चिक राशीच्या लोकांनी मॅनेजमेन्टमध्ये करिअर केलं तर त्यांना नोकरी- व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 06:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...