मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या 5 सवयी अनेकांना जीवनात यश मिळवू देत नाहीत; तुम्हीही अशा गोष्टींच्या अधीन नाहीत ना?

या 5 सवयी अनेकांना जीवनात यश मिळवू देत नाहीत; तुम्हीही अशा गोष्टींच्या अधीन नाहीत ना?

अशा सवयी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामगिरींमध्ये मागे खेचतात. या सवयींमुळे वर्तमान आणि भविष्यकाळ असे दोन्ही अंधारात जाऊ शकतात

अशा सवयी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामगिरींमध्ये मागे खेचतात. या सवयींमुळे वर्तमान आणि भविष्यकाळ असे दोन्ही अंधारात जाऊ शकतात

अशा सवयी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामगिरींमध्ये मागे खेचतात. या सवयींमुळे वर्तमान आणि भविष्यकाळ असे दोन्ही अंधारात जाऊ शकतात

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : वाईट सवयी (Habits) आपली ऊर्जा नष्ट करतात. आपल्या यशस्वी (Success) होण्यामध्ये अडथळा आणतात आणि काही वेळा धोकादायकही ठरू शकतात. अशा सवयींनी आपले सर्व प्रयत्न निष्फळ होऊ शकतात आणि आपला पाया कमकुवत करू शकतात. अशा सवयी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामगिरींमध्ये मागे खेचतात. या सवयींमुळे वर्तमान आणि भविष्यकाळ असे दोन्ही अंधारात जाऊ शकतात. चला तर, आम्ही तुम्हाला आज अशा सवयींबद्दल सांगू, ज्या कोणत्याही व्यक्तीला जीवनात (Life) अपयशाकडे खेचतात, यशामध्ये अडथळा (Habits that can Destroy Your Success) आणतात.

कोणत्या आहेत आपल्याला अपयशाकडे नेणाऱ्या सवयी

1. नकारात्मक विचार

काही लोक काहीही करण्यापूर्वी त्याबद्दल नकारात्मक विचार करतात. ते नेहमी निराश असतात. ते स्वतःच्या आजूबाजूलाही निराशाजनक वातावरण निर्माण करतात. असे लोक जीवनात ‘काही नुकसान होईल की काय,’ या भीतीनं काहीच पाऊल उचलण्यास तयार होत नाहीत. यामुळं ते उलटसुलट विचार करत निष्क्रिय राहतात. असे लोक अनेकदा इतरांचाही उत्साहभंग करून त्यांनाही निराश करतात. अशा लोकांनी हा विचार करणं आवश्यक आहे की, जीवनात आव्हानं स्वीकारणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. अशा परिस्थितीत सकारात्मक राहा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा.

2. इतिहास उगाळत राहणं किंवा इतिहासातच गुंग राहणं

बऱ्याच वेळा आपण आपल्या आयुष्यात काही अपयशाच्या किंवा दुःखद घटनांशी स्वतःला घट्ट बांधून ठेवतो आणि प्रत्येक परिस्थितीत काहीही करण्यापूर्वी या घटना पुन्हा पुन्हा आठवत राहतो. पुढील प्रत्येक पायरी याच घटनांचा विचार करून ठरवण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, इतिहासात राहण्याच्या या सवयीमधून बाहेर पडा. जर तुम्ही तुमचं जुनं अपयश उगाळत त्याच्याबद्दलच विचार करत राहिलात तर, तुमचा भविष्यकाळ उध्वस्त कराल.

हे वाचा - वयाच्या 60व्या वर्षी 2 कोटी रुपये हवे असतील, तर दरमहा किती रुपयांची SIP करावी? वाचा सविस्तर

3. अशक्य शब्दाचा वापर

माणसासाठी तसं पाहिलं तर कोणतंही काम अशक्य नाही. मनात दृढनिश्चय असेल तर, सर्व काही शक्य आहे. अशा परिस्थितीत, ‘अशक्य’ शब्द तुमच्या आयुष्यातून काढून टाकला पाहिजे. एखादी गोष्ट आपण करू शकणार नाही, हे प्रयत्न करण्याच्या आधीच ठरवून टाकणं हे तुमच्या यशामध्ये अडथळा ठरतं.

4. नवी आव्हानं स्वीकारण्याला घाबरणे

काही लोकांना अतिशय सुरक्षित जीवन जगायला आवडतं. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नसतो. पण जर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही जोखीम घेतली नाही तर, तुम्ही आयुष्यात कधीही यशाची चव चाखू शकणार नाही.

हे वाचा - सणासुदीच्या काळात या 10 बँका देताहेत स्वस्त गृहकर्ज, जाणून घ्या किती असेल EMI?

5. फक्त इतरांमध्ये दोष शोधणं

काही लोकांना सवय असते की, ते सर्व दोष इतरांवर टाकतात आणि इतरांना प्रत्येक गोष्टीत दोष देत राहतात. स्वतःच्या अपयशाचं खापर इतरांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करतात. पण अशा सवयी असलेले लोक आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. इतरांच्या उणिवा पाहण्याऐवजी जे स्वतःच्या दोषांवर लक्ष केंद्रित करून ते दूर करण्याचा सतत प्रयत्न करत राहतात, ते यशस्वी होतात.

First published:

Tags: Success, Success story