Home /News /lifestyle /

कोरोनापासून बचाव करायचा असेल तर... संशोधनातून समोर आली ही मोठी गोष्ट

कोरोनापासून बचाव करायचा असेल तर... संशोधनातून समोर आली ही मोठी गोष्ट

आपण जे खातो त्यातून आपली शरीरप्रकृती तर घडतेच. मात्र इतरही महत्त्वाच्या गोष्टी यातून होत असल्याची बाब एका संशोधनातून समोर आली आहे.

    मुंबई, 24 डिसेंबर : आपण कधी, काय, किती खातो हे महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर आणि संशोधक सांगत असतात. आता कोरोनासरखअया विषाणूंसोबत (corona virus) लढण्याचाही याच्याशी संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे. पोषक तत्त्वांचं (nutrients) ज्ञान आणि संशोधनातून (research) गंभीर विषाणुंच्या धोक्याला आळा घालण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. कोविड 19 चाही यातच समावेश होतो. या अभ्यासातून सांगितलं गेलं आहे, की आदर्श आणि समतोल आहारातून व्यक्तीची प्रतिकारशक्ती (immunity) बळकट होते. यातून नैसर्गिक तत्व मिळतात, जी इतर कृत्रिम तत्वांहुन अधिक प्रभावी असतात. हे म्हणणं आहे, या संस्थेतील आहारतज्ञ नॅन्सी साहनी यांचं. 'न्यूट्रिशन ऑड्स टु इव्हन आउट कोरोना' या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. Indian Express ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रिसर्च पेपरमध्ये त्या म्हणतात, "याकाळात प्रकाशित झालेले अहवाल सांगतात, की व्यक्तीच्या पोषणविषयक अवस्थेचा परिणाम त्याचं शरीर विषाणूंना कसं रोखून धरतं यावर होतो. सोबतच वायरल जीनोम, वायरल सिवीयरिटी आणि ज्याचे पुनरुत्पादन होऊ शकेल असे जीनोम म्युटेशन्स यावरही पोषणस्थितीचा परिणाम होतो. 'आपण जे खातो तसेच होतो' हे सत्य असल्याचाच प्रत्यय या साहनी यांच्या लेखातून येतो. नैसर्गिक आणि अ‍ॅडाप्टिव अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिकारशक्तीसाठी सूक्ष्मपोषकद्रव्यं, जीवनसत्वं आणि खनिजं गरजेची असतात. यातूनच शरीरात एन्टीबॉडीज तयार होतात. लोह, झिंक आणि सेलेनियमसारखी काही खनिजं इम्युन सेल्सच्या वाढ आणि कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एका खाद्यपदार्थाला कधीच दुसरा खाद्यपदार्थ पर्याय असू शकत नाही. वैविध्य हेच पोषणाचे रहस्य आहे. या पोषणतत्वांमध्ये असलेली अ‍ॅन्टीऑक्सीडंट क्षमता त्यांना इम्युन प्रोटेक्शनचा गुण बहाल करते. कोरोनावायरस तसा सगळ्या जगात पसरला आहेय मात्र त्याचे सर्वाधिक घातक प्रकार ज्या देशांत पाश्चात्य पद्धतीची आहारपद्धत अवलंबली जाते तिथेच दिसून येत आहेत. हाय सॅच्युरेटेड फॅट, लो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि मायक्रोन्युट्रीयन्ट्स आहारात जास्त घेणाऱ्या देशांमध्ये कोरोना घातक बनलेला दिसतो. हळद, आलं आणि लसूण हे पदार्थ अ‍ॅन्टी इनफ्लेमेटरी, अ‍ॅन्टी मायक्रोबियल आणि अ‍ॅन्टीऑक्सीडन्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यांचा आहारात समावेश असू द्यावा असंही साहनी यांनी रिसर्च पेपरमध्ये सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Food, Virus

    पुढील बातम्या