मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भावनाच नाही तर आता डोळ्यातून समजणार माणसाचा मृत्यू! किती आयुष्य शिल्लक याचे मिळणार संकेत

भावनाच नाही तर आता डोळ्यातून समजणार माणसाचा मृत्यू! किती आयुष्य शिल्लक याचे मिळणार संकेत

डोळ्यांतला रेटिना (पडदा) (Retina) हा व्यक्तीच्या आरोग्याचा आरसा असतो. रेटिनाच्या स्थितीवरून विविध आजार आणि मृत्यूचादेखील अंदाज बांधता येऊ शकतो, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

डोळ्यांतला रेटिना (पडदा) (Retina) हा व्यक्तीच्या आरोग्याचा आरसा असतो. रेटिनाच्या स्थितीवरून विविध आजार आणि मृत्यूचादेखील अंदाज बांधता येऊ शकतो, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

डोळ्यांतला रेटिना (पडदा) (Retina) हा व्यक्तीच्या आरोग्याचा आरसा असतो. रेटिनाच्या स्थितीवरून विविध आजार आणि मृत्यूचादेखील अंदाज बांधता येऊ शकतो, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

मेलबर्न, 21 जानेवारी: माणसाचं आयुर्मानआणि मृत्यूविषयी छातीठोकपणे भाष्य कोणालाही करणं शक्य नाही. या विषयावर आतापर्यंत भरपूर संशोधन (Research on Death) झालं आहे. त्यातून या अनुषंगाने काही बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काही शारीरिक बदल (Physical Changes) मृत्यू समीप आल्याचे संकेत देतात, असं संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियातल्या संशोधकांनी या विषयावर नुकतंच सखोल संशोधन केलं. यात डोळ्यांच्या तपासणीवरून मृत्यूचा अंदाज येऊ शकतो, असं दिसून आलं आहे. डोळ्यांतला रेटिना (पडदा) (Retina) हा व्यक्तीच्या आरोग्याचा आरसा असतो. रेटिनाच्या स्थितीवरून विविध आजार आणि मृत्यूचादेखील अंदाज बांधता येऊ शकतो, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

माणसाच्या भावना त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होतात, असं म्हटलं जातं; पण आता डोळ्यांच्या माध्यमातून केवळ भावनांचाच नव्हे, तर संबंधित व्यक्तीला होणारे आजार आणि अगदी मृत्यूचाही अंदाज घेता येणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न सेंटर फॉर आय रिसर्चच्या (Melbourne Center For Eye Research) संशोधकांनी नुकतंच याबाबत संशोधन केलं आहे. डोळ्यांतला रेटिना हा माणसाच्या आरोग्याचा आरसा असतो. त्यामुळे डोळ्यांचं स्कॅनिंग (Eye Scanning) करून त्याला मृत्यूचा धोका आहे का, त्याच्या आयुष्याचे किती दिवस शिल्लक आहेत, हे सांगितलं जाऊ शकतं, असं या संशोधकांनी म्हटलं आहे. रेटिनावर दिसणारा वयाचा परिणाम या स्कॅनिंगमधून तपासता येऊ शकतो. तसंच रेटिनामुळे आरोग्यविषयक समस्यांविषयीही माहिती मिळते, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

हे वाचा-कोंब आलेले बटाटे खाताय तर सावधान! प्रकृतीसाठी ठरतील अत्यंत हानीकारक

याबाबत संशोधक डॉ. लिसा झू यांनी सांगितलं, की `रेटिना हा वृद्धत्वाचा सूचक आहे. तो एजिंगविषयी संकेत देतो. तसंच यामुळे मानवी आरोग्यविषयक माहिती मिळते. याच्या मदतीनं भविष्यात मृत्यूचं कारण ठरू शकणाऱ्या हृदयाच्या आणि मेंदूच्या विकारांविषयी माहिती मिळवता येते, असं या संशोधनात दिसून आलं.

रेटिनल स्कॅनिंगद्वारे अल्झायमर आणि हृदयविकाराचा अंदाज बांधणं शक्य आहे, असा दावा यापूर्वीच्या संशोधनातून करण्यात आला होता. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, रेटिनाच्या मागच्या भागात असलेला थर प्रकाशासाठी संवेदनशील असतो. त्याच्या मदतीनं अनेक आजारांचा शोध घेता येऊ शकतो.

हे वाचा-हिवाळ्यात तुमचीही दाढी झालीय रफ & ड्राय? या टिप्स वापरून मिळवा भारदस्त लूक

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, माणूस आणि रेटिनाच्या वयातला फरक लक्षात घेऊन माणूस अजून किती काळ जगेल हे सांगता येऊ शकतं. संशोधनादरम्यान, डोळ्यांची तपासणी करताना जी छायाचित्रं घेतली जातात, त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या आयुर्मानाबाबतचा निकाल स्पष्ट होतो. मृत्यूचा धोका दर वर्षी 2 टक्क्यांनी वाढतो, असं संशोधन सांगतं.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, मेलबर्न सेंटर फॉर आय रिसर्च या संस्थेने या संशोधनासाठी खास आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अल्गोरिदम तयार केला आहे. या माध्यमातून डोळ्यांतल्या रेटिनाच्या 19 हजार छायाचित्रांचं विश्लेषण करण्यात आलं.

याशिवाय, यूकेतल्या बायोबॅंकमध्ये 36 हजार व्यक्तींच्या रेटिनाच्या वयाचं अंतर जाणून घेण्यात आलं. यात 50 टक्क्यांहून अधिक व्यक्तींच्या डोळ्यांतला रेटिना त्यांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या रेटिनासारखा होता. काही व्यक्तींच्या डोळ्यांतला रेटिना त्यांच्या वयाच्या तुलनेत 10 वर्षांनी मोठा होता, असं संशोधनाच्या अहवालात म्हटलं आहे.

First published:

Tags: Eyes damage