पायांनी सुईत ओवते धागा, हातांशिवाय लॅपटॉप आणि व्हॉट्सअपही चालवते

'दिल के जीते जीत है और दिल के हारे हार' ही गोष्ट निधी गुप्ताकडे पाहून खरी असल्याचं कळतं.

  • Share this:

हिंदीत एक चांगलं वाक्य आहे की, 'दिल के जीते जीत है और दिल के हारे हार'. हे वाक्य तंतोतंत खरं असल्याचं निधी गुप्ताकडे पाहून कळतं. मध्यप्रदेश येथील नरसिंहपुर जिल्ह्यातील विद्यार्थिनी निधीने  पायांच्या मदतीने तिने DCA आणि ITI चं प्रशिक्षण घेतलं आहे.

गोरबगाव येथे राहणारी निधी गुप्ताला जन्मतःच हात नव्हते. पण, आपल्या नशिबावर रडत बसणं तिला मंजूर नव्हतं. निधी तिची सर्व कामं सराईतपणे पायांनी करते.

निधी सुईत धागा ओवण्यापासून ते मोबाईल, लॅपटॉप चालवण्यापर्यंत सर्व कामं पायांनी करते.

विशेष म्हणजे ती आयुष्याशी एका लढवय्याप्रमाणे लढत आहे. पण, फक्त निधीच धैर्याने या सगळ्याला सामोरी जातेय असं नाही तर तिला तिच्या कुटुंबानेही तेवढीच साथ दिली आहे. निधीला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे. तिने हायर सेकेंडरीसह डीसीए आणि आयटीआयच्या परीक्षा पायांनी दिल्या. यात ती उत्तीर्णही झाली.

अभ्यास आणि इतर कामांसोबत निधी पायांच्या मदतीने उत्तम जेवणही बनवते. तिची हिच अनन्यासाधारण हिंमत पाहून मध्यप्रदेशचे कृषी कल्याण आणि कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांनी तिला दत्तक घेतलं आहे. तिच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला आहे.

निधीच्या स्वप्नांना सरकारची मदत मिळावी अशीच आता तिच्या कुटुंबाची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 02:12 PM IST

ताज्या बातम्या