डिप्रेशनला हरवलं; आता इतरांना मानसिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी लढतोय तरुण

डिप्रेशनला हरवलं; आता इतरांना मानसिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी लढतोय तरुण

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी या तरुणाला त्याच्या पालकाने आणि मित्राने मदत केली आणि आता हा तरुण इतरांना मदत करतो आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : डिप्रेशनमधून (Depression) बाहेर पडणं म्हणजे कठीण मात्र कुणाचा आधार असेल तर ते शक्य होतं आणि अशाच आधारामुळे एक तरुण डिप्रेशनच्या विळख्यातून बाहेर आला. इतकंच नव्हे तर आता डिप्रेशनचे शिकार झालेल्या इतरांना तो आधार देत त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे.

ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजवर या तरुणाने डिप्रेशनबाबतचा आपला अनुभव शेअर केला आहे. या तरुणाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. प्रेमात फसवणूक झाल्याने हा तरुण डिप्रेशनमध्ये गेला होता.

तरुणानं सांगितलं, "दोन वर्षांपूर्वी मी खूप आनंदी होतो, प्रेमात होतो आणि माझं आयुष्य एकदम सुरळीत सुरू होती. अचानक माझ्या गर्लफ्रेंडने माझ्यासह ब्रेक केला. आम्हा दोघांमध्ये खूप फरक असल्याचं कारण तिनं दिलं. ब्रेकअप झालं त्या रात्री मी खूप अस्वस्थ झालो. मला एन्झायटीचा अटॅक आला आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो. एन्झायटीच माझी सोबती झाली होती. मला रात्री झोप लागायची नाही. मला सर्वकाही आठवून खूप रडायला यायचं, एकदा असंच रडता रडता मी जमिनीवर कोसळलो. मला श्वास घ्यायला त्रास होत होता. माझी अवस्था पाहून माझ्या रूममेटने मला रुग्णालयात पोहोचवलं"

तरुण म्हणाला, "मला खूप त्रास होत होता. तीन महिने मी कामही केलं नाही. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक गरजेचा होता असं मला वाटलं. मी माझ्या घरी माझ्या आईवडिलांजवळ गेलो. माझ्या वडिलांना माझ्यावर अँटिडिप्रेशनची औषधं मिळाली आणि त्यांना माझी चिंता वाटू लागली. माझ्या आईनं मला खूप समजावलं, तुझ्यावर खरं प्रेम करणाऱ्यांना त्रास होईल असं तू काही करू नको असं आईने सांगितलं. पालकांचं म्हणणंही बरोबर होतं मात्र मी फक्त माझ्या गर्लफ्रेंडचाच विचार करत होतो"

हे वाचा - डिप्रेशनग्रस्तांसाठी खास Nasal Spray; आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यापासून रोखणार

"माझ्या मित्राने माझी खूप मदत केली. तासातासाला तो माझ्या तब्येतीची चौकशी करायचा, माझ्यासाठी चहा बनवायचा, आम्ही दोघं फिल्म पाहायलादेखील जायचो. मी त्याच्यासाठी खूप काही आहे, असं तो मला म्हणाला आणि मला ते ऐकून खूप बरं वाटलं. हळूहळू सर्वकाही ठिक होऊ लागलं. मी पुन्हा कामावर जाऊ लागलो आणि स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो", असं तरुणाने सांगितलं.

तरुण म्हणाला, "मी मानसिक आरोग्याबाबत वाचन करायला सुरू केलं आणि मग मला समजलं या परिस्थितीतून जाणारा मी एकटा नाही. नुकतंच मी एका तरुणाने आत्महत्या केल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर वाचली आणि ती पोस्ट माझे मित्र आणि सुसाइड प्रिव्हेन्शन अॅक्टिव्हिस्टसह शेअर केली. त्यांनी त्या तरुणीला वाचवलं. यानंतर दोन-तीन दिवस मी खूप विचार केला. असे कित्येक लोक आहेत जे या परिस्थितीतून जात आहेत, लोकांना काय काय सहन करावं लागत आहे. मला वाटलं मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे"

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये शरीरासह मन कसं ठेवाल फिट; अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिल्या टीप्स

"गेल्या दोन वर्षांत मी आयुष्याकडून खूप काही शिकलो. तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही. मला माझं प्रेम पुन्हा मिळालं नाही मात्र माझ्या मनावरील घाव हळूहळू भरू लागले.  मला माझ्या रूममेटने खूप काही शिकवलं. माझी आई आजही मला थेरेपी घेण्याची आठवण करून देते. सर्वजण माझी खूप काळजी घेतात हे मला माहिती आहे. आता मला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे आणि माझं स्वप्नं पूर्ण करायचं आहे", अशी जिद्द आता या तरुणाने बाळगली आहे.

Published by: Priya Lad
First published: August 7, 2020, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading