बिलासपूर, 15 जुलै : रविवारच्या दिवशी मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असताना त्याच्या अनपेक्षितपणे छातीत दुखू लागलं. खरं तर त्याआधीच त्यानं मैदानात 50 धावा केल्या होत्या. गोलंदाजी करताना त्याच्या छातीत कळ आली आणि मित्रांनी त्याला घरी पोहोचवलं. घरी जाऊन पाणी प्यायल्यानंतर तो विश्रांती घ्यायला म्हणून अंथरुणावर पडला आणि त्यानंतर उठलाच नाही. शरीराच्या हलचाली बंद झाल्याने नातेवाईक आणि आसपासच्या मंडळींनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं, पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये ही घटना घडली अभिषेक उर्फ काजू यादव या तरुणाच्या बाबतीत ही दुर्घटना घडली. अभिषेकची तब्येत चांगली होती. अंगापिंडानेही तो हट्टाकट्टा होता. त्यामुळे दिवसा स्वतःची गाडी तो चालवत असे आणि संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये बाउन्सरचं काम करत असे. दर रविवारी मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला जाण्याचा त्याचा शिरस्ता होता.
14 जुलैला तो नेहमीप्रमाणे सकाळी क्रिकेट खेळायला बाहेर पडला, पण छाती दुखायचं निमित्त झालं आणि घरात शिरल्याबरोबरच त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
जगातूनच नाहिशी होऊ शकते तुमची ही आवडती गोष्ट...!
बिलासपूरच्या पीजीबीटी कॉलेजच्या मैदानाजवळ टिकरापारा गावाजवळ ही घटना घडली. मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असताना अभिषेकच्या छातीत दुखायला लागलं. मित्रांनी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. पण तो घरी सोडा म्हणाला. मैदानावर मोबाईल विसरलोय तो घेऊन यायलाही त्यानं मित्राला सांगितलं. मित्र मोबाईल घेऊन घरी पोहोचेपर्यंत अभिषेकनं जग सोडलं होतं. अभिषेकचं लग्न 2010मध्ये झालेलं होतं आणि त्याला 4 वर्षांचा मुलगाही आहे. अभिषेकला पहिल्यापासून हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्याचं त्याच्या कुटुंबीयांकडून समजतं.
या बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं वयाच्या 42 व्या वर्षी लग्न करण्याचं कारण!
तरुण वयात अशा प्रकारे हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे थकवा येणं, जास्त दम लागणं, डोकं दुखणं, छाती दुखणं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असं तज्ज्ञ सांगतात. रक्तदाब, हृदयविकार याची ही लक्षणं असू शकतात. तरुण वयात असणारी व्यसनं यामुळेसुद्धा अशा आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं.
VIDEO : बिबट्याचा थरार, 12 तासांनी सापळ्यातून केली सुटका