आपल्या आईपासून या 5 गोष्टी कधीही लपवू नका, नंतर होईल पश्चाताप!
असं म्हणतात की जगात आईसारखी सर्वोत्तम मैत्रीण कोणी असूच शकत नाही. मात्र जस जशी मुलं मोठी होत जातात ते आपल्या आईपासून अनेक गोष्टी लपवतात.

आई- मुलांचं नातं हे फार खास असतं. असं म्हणतात की जगात आईसारखी सर्वोत्तम मैत्रीण कोणी असूच शकत नाही. मात्र जस जशी मुलं मोठी होत जातात ते आपल्या आईपासून अनेक गोष्टी लपवतात.

एक गोष्ट लक्षात ठेवा की आईपासून गोष्टी लपवल्याचे सर्वात जास्त तोटे हे मुलांचेच असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या मुलांनी आईपासून कधीही लपवू नये.

आपल्या आईला तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या निर्णयाबद्दल अर्थात प्रेमाबद्दल आधीच कल्पना द्या. या विषयी तिच्याशी मोकळेपणाने चर्चा केली तर ती तुमच्या समवयस्कर मैत्रिणीपेक्षा जास्त चांगला सल्ला देईल. कोणत्याही नात्यात जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावं हे आई जास्त चांगलं सांगू शकेल.

मित्रांचे कारनामे- आपल्या सर्व मित्र- मैत्रिणींचे कारनामे, मजा- मस्ती, भांडणं आईला नक्की सांगा. तिच्या अनुभवाने तुमच्यासाठी कोणते मित्र- मैत्रिणी चांगले आहेत हे ती चांगल्या प्रकारे सांगू शकेल.

आवडी- निवडीबद्दल सांगा- तुमच्या सगळ्या आवडी- निवडीबद्दल आईपेक्षा जास्त चांगलं कोणचं ओळखू शकत नाही. तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही नक्की काय विचार करत आहात ते सांगा.

नातेवाईकांची वागणूक- अनेकदा नातेवाईकांचा तुमच्याशी असलेला व्यवहार पसंत पडत नाही. याबद्दल आपण समाजाच्या भीतीने कोणाशीही बोलत नाही. जर तुमचे नातेवाईक तुमच्याशी अयोग्यरित्या वागत असतील तर सर्वातआधी आईला सांगा.

ऑफिसमधलं गॉसिप- आईसोबत तुम्ही ऑफिसमधील दिवसभरातील गोष्टी शेअर करू शकता. भलेही तिला ऑफिसमधील तुम्ही सांगत असलेल्या सर्व गोष्टी कळत नसतील पण तुम्हाला मार्ग दाखवण्यात ती नक्कीच मदत करू शकेल.
First Published: Sep 15, 2019 07:29 PM IST