मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

cancer : कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

cancer : कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

कॅन्सरचे वेळीच निधान झाले नाही तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे (cancer symptoms) सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं असू शकतात. कर्करोग (cancer) हा एक असा आजार आहे, जो हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. त्याचे वेळीच निधान नाही झाले तर, रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. बर्‍याच लोकांना वाटतं की, कर्करोगाची लक्षणं प्रगत अवस्थेत दिसून येतात. परंतु, तसं नाही, काही प्रारंभिक लक्षणे देखील या आजाराचे संकेत देतात. अनेकदा असे घडते की आपण या लक्षणांकडे (cancer symptoms) सामान्य म्हणून दुर्लक्ष करतो. याबाबत झी न्यूजने बातमी प्रसिद्ध केली आहे.

वजन कमी होणं

जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, सावध व्हा. हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

शरीरात सूज किंवा गाठ

शरीराच्या कोणत्याही भागात सूज किंवा गाठ दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. ओटीपोटात, स्तनात किंवा अंडकोषात गाठ कर्करोगामुळं असू शकतं.

सतत खोकला

सतत खोकला हेदेखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं. कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. सतत खोकला, कफासह रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.

तीळ किंवा चामखीळीमध्ये बदल

तीळ किंवा चामखीळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. बहुतेक लोकांना ते लक्षात येत नाही. परंतु, ते त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. नवीन चामखीळ दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखीळ किंवा तीळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका.

लघवीमध्ये रक्त दिसणं

लघवीतील रक्त हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ही आतड्याच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. यासाठी मलविसर्जनाच्या आणि लघवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. म्हणजेच, तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा शौचाला/लघवीला जा आणि बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. मूत्रात रक्त येणं हे मूत्राशय किंवा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

हे वाचा - आईवर प्रेम आणि मुलीसोबत करायचा चाळे; डबल गेम करणाऱ्या तरुणाला मायलेकीनं दिला भयंकर मृत्यू

तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर त्याकडं दुर्लक्ष करू नका. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाची ही लक्षणं असू शकतात. याच्यामुळं पाठीच्या खालच्या भागात वेदनाही होऊ शकतात.

वेदना जाणवणं

अनेक आठवडे सतत वेदना जाणवत राहिल्यास, हीदेखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात. कर्करोगाच्या संशोधनानुसार, कर्करोगाशी संबंधित वेदना होतात. कारण, ट्यूमरमुळं हाडं, मज्जातंतू आणि इतर अवयवांवर दबाव येतो.

हे वाचा - Corona: डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे हा नवा कोरोना स्ट्रेन; भारतात आहेत का रुग्ण?

छातीत जळजळ

तुम्हाला सतत छातीत जळजळ होत असेल तर, ते कॅन्सरचं लक्षणही असू शकतं. हे पोट किंवा घशाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

अन्न गिळण्यात अडचण

अन्न खाताना दुखणं किंवा गिळताना त्रास होणं, खाताना अन्न पुन्हा पुन्हा घशात अडकणं हीदेखील कर्करोगाची लक्षणं असू शकतात. अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या बाबतीत हे होऊ शकतं.

हे वाचा - कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे शेअर बाजारालाही धक्के; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

रात्री घाम येणं

रात्री घाम येणं हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचं धोक्याचं लक्षण असू शकतं. हे बहुतेक लिम्फोमाच्या बाबतीत घडतं. या प्रकारचा कर्करोग लिम्फॅटिक प्रणालीमध्ये होतो. लिम्फॅटिक सिस्टीम हे संपूर्ण शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्या आणि ग्रंथींचं जाळं असून कर्करोगामुळं यांत अडचणी निर्माण होतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. News 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Cancer, Health Tips