कंडोमबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

कंडोमबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

योग्य पद्धतीने कंडोम वापरले तर स्त्री 85 ते 98 टक्के गरोदर होत नाही. असं असलं तरी हे 100 टक्के सुरक्षित नाही.

  • Share this:

Condom पातळ रबरापासून तयार करतात. याचा उपयोग गर्भारपणापासून वाचण्यासाठी केला जातो. सेक्स दरम्यान याचा वापर पुरुषांकडून केला जातो. जेणेकरून स्पर्म (वीर्य) स्त्रीच्या गर्भाशयात जाऊ नये. अधिकतर कंडोम हे लेटेक्सपासून तयार केले जातात. योग्य पद्धतीने कंडोम वापरले तर स्त्री 85 ते 98 टक्के गरोदर होत नाही. असं असलं तरी हे 100 टक्के सुरक्षित नाही. काही लोकांना लेटेक्समुळे अलर्जी होते. त्यांच्यासाठी पॉलियुरथेनने तयार केलेले कंडोम बाजारात उपलब्ध आहेत. कंडोमशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊ...

कंडोमच्या वापराने एसटीडी (सेक्सुली ट्रान्समिटेड डिसीज) रोग होण्याचा खतरा कमी होतो. यामुळे एचआयव्ही पॉझिटीव्हसारखा आजार होण्याची शक्यता बहुतांशी कमी होते. कंडोम फार नाजुक असतं. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे, नखांचा, अंगठीच्या किंवा टोकदार गोष्टीचा वापर त्यावर केला तर ते फाटू शकतं. फाटलेल्या कंडोमचा वापर करता कामा नये.

जोडीदारासोबत सेक्स करताना जर कंडोम फाटलं तर त्वरीत गर्भनिरोधक गोळी घेणं आवश्यक आहे. असं केल्याने गरोदर होण्याची शक्यता कमी होते. सेक्स करताना नेहमी चांगल्या दर्जाचं कंडोम वापरायला प्राधान्य द्यावं. कंडोम विकत घेताना त्याची एक्सपायर डेट निघून गेलेली नाही ना.. तसेच पाकीट फाटलेलं किंवा जूनं तर नाही ना ते तपासून घेणं आवश्यक आहे.

आंधळ्या पत्नीसाठी तयार केली गुलाबाची बाग, ही अनोखी लव्हस्टोरी एकदा वाचाच!

झोपण्याच्या या 4 पोझिशनमुळे शरीराला होतात अनेक फायदे!

संध्याकाळी रडल्यावर कमी होतो लठ्ठपणा, संशोधनात झालं सिद्ध!

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

Published by: Madhura Nerurkar
First published: July 31, 2019, 8:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading