मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Onion Hacks: किचनपासून कारपर्यंत.. कांद्याचे इतके फायदे यापूर्वी तुम्हाला कोणी सांगितले नसतील

Onion Hacks: किचनपासून कारपर्यंत.. कांद्याचे इतके फायदे यापूर्वी तुम्हाला कोणी सांगितले नसतील

Onion Hacks: कांद्याचा वापर खाण्याव्यतिरिक्त अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. विशेषतः स्वयंपाकघरातील लहान-मोठी कामे चुटकी सरशी आणि स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे.

Onion Hacks: कांद्याचा वापर खाण्याव्यतिरिक्त अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. विशेषतः स्वयंपाकघरातील लहान-मोठी कामे चुटकी सरशी आणि स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे.

Onion Hacks: कांद्याचा वापर खाण्याव्यतिरिक्त अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. विशेषतः स्वयंपाकघरातील लहान-मोठी कामे चुटकी सरशी आणि स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 जानेवारी : कांद्याचा वापर कित्येक पदार्थांमध्ये, जेवणात केला जातो. कांदा (Onion) जेवणाची चव वाढवतो यात शंका नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? कांद्याचा वापर खाण्याव्यतिरिक्त अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो. विशेषतः स्वयंपाकघरातील लहान-मोठी कामे चुटकी सरशी आणि स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे. कांदा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेच, परंतु त्याचा वापर इतर मार्गांनी देखील केला जाऊ शकतो, ज्यामुळे स्वयंपाकघरातील काम सुलभ होण्यास मदत होते. आज आम्‍ही तुम्‍हाला कांद्याशी संबंधित असे काही उपयोग सांगणार आहोत, जे वापरून तुम्‍ही स्वयंपाकघरातील काम सोपे करू शकता. स्वयंपाकघराव्यतिरिक्त, कांद्याचा वापर आपल्या इतर अनेक गरजांसाठी खूप उपयुक्त (Onion Hacks) ठरू शकतो.

अशा प्रकारे कांदा वापरा

1. ओव्हन क्लीनिंग - ओव्हन आणि ग्रील घाण झाल्यावर साफ करणे खूप कठीण काम बनते, परंतु कांद्याच्या मदतीने तुम्ही ते सहज स्वच्छ करू शकता. येथे कांद्याचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि जंतुनाशक गुणधर्म खूप प्रभावी ठरतात. कांदा सोलून त्याचे गोल तुकडे करा आणि नंतर ग्रिल रॉड्स आणि ओव्हन साफ ​करण्यासाठी वापरा. त्यामुळे अन्नातील बॅक्टेरियाही नष्ट होतात.

2. दुर्गंधी घालवण्यासाठी - सर्व घरांमध्ये ही बाब सामान्य आहे की, कधीकधी तांदूळ शिजवताना भाजतात किंवा दूध जास्त उकळल्यामुळे गॅस बर्नरवर पडते किंवा काही वेळा जास्त शिजवल्यामुळे डाळ जळते. असं झालं की स्वयंपाकघर एका विचित्र वास भरून जातो. हा वास निघून जायला खूप वेळ लागतो. अशा कठीण परिस्थितीत कांद्याचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो. जेव्हा असे घडते तेव्हा कांद्याचे काही काप बर्नरवर किंवा जळालेल्या/करपलेल्या भागावर ठेवावेत. यामुळे कांदा काही वेळात सर्व वास शोषून घेतो.

3. फळे ताजी राहतात (फळे तपकिरी होत नाहीत) – अनेक वेळा असे दिसून येते की कोणतेही फळ जास्त काळ चिरून ठेवले तर त्यात ऑक्सिडेशन प्रक्रिया सुरू होते आणि ते तपकिरी होऊन खराब होऊ लागतात. कांद्यामध्ये असलेली नैसर्गिक आर्द्रता आणि सल्फर ही प्रक्रिया कमी करण्यास आणि ऍव्होकॅडो, सफरचंद यांसारखी फळे दीर्घकाळ चांगली ठेवण्यास मदत करते.

4. गंज काढण्यासाठी उपयोग - गंज काढण्यासाठी देखील कांद्याचा रस वापरला जाऊ शकतो. अनेकवेळा स्वयंपाकघरातील कोणतीही भांडी, सुऱ्या किंवा चमच्यांमध्ये ओलाव्यामुळे गंज लागतो. अनेक वेळा साबणाने साफ करूनही गंज जात नाही. अशा परिस्थितीत कांदा खूप उपयुक्त ठरू शकतो. चाकूवर गंज लागला असल्यास कांद्याच्या आत चाकू ठेवून काही वेळ तसाच ठेवून नंतर तो काढून स्वच्छ केला की गंज निघून जातो. तसेच गंजलेल्या जागेवर कांद्याचा रस काही वेळ चोळल्यानेही त्याचा परिणाम दिसून येतो.

हे वाचा - Traffic Rule: Car Driving वेळी फोनवर बोलताना नाही लागणार दंड, पण… पाहा काय आहे नवा नियम

या समस्यांमध्येही कांदा कामी येतो

1. हिवाळ्यात गाडीच्या विंडशील्डवर रात्री ओलावा आणि दव जमा होणे ही एक सामान्य समस्या आहे. सकाळी लवकर गाडी वापरणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. जर कांद्याचे तुकडे रात्री विंडशील्डवर घासले तर सकाळी विंडशील्डवर दव साचलेले दिसणार नाही.

2. कांद्याचा वापर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केसांवर उपचार करण्यासाठी अनेक घरगुती उपायांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांद्यामध्ये भरपूर सल्फर असते जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

हे वाचा - वयाच्या 40 नंतर आरोग्याच्याबाबतीत अनेकजण या 6 चुका करतात; आयुष्यभर भोगावे लागतात परिणाम

3. जर तुम्ही घरामध्ये नवीन पेंट केले असेल तर त्याचा वास त्रासदायक वाटू शकतो. तुम्हाला अशा प्रकारची समस्या येत असेल तर, तीन किंवा चार कांद्याचे तुकडे करा आणि ज्या खोलीत पेंट केले आहे, त्या खोलीत प्लेटमध्ये ठेवून द्या. काही तासांमध्ये कांदा पेंटचा वास शोषून घेईल.

First published:

Tags: Lifestyle, Onion