Home /News /lifestyle /

'या' 15 देशांत भारतीय लायसन्सच्या मदतीने चालवू शकता वाहन

'या' 15 देशांत भारतीय लायसन्सच्या मदतीने चालवू शकता वाहन

दुसऱ्या देशात गेल्यानंतर गाडी चालवण्यासाठी नवीन लायसन्स तयार करावं लागतं. पण काही देश असे देखील आहेत, जिथे भारतीय लायसन्सच्या मदतीनी गाडी चालवता येऊ शकते.

  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : जगातील प्रत्येक देशात वेगळं ड्रायव्हिंग लायसन्स असतं. त्यामुळे त्या देशात गेल्यानंतर आपल्याला गाडी चालवण्यासाठी नवीन लायसन्स तयार करावं लागतं. पण काही देश असे देखील आहेत, जिथे भारतीय लायसन्सच्या मदतीनी गाडी चालवता येऊ शकते. या देशांमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय लायसन्सशिवाय काही दिवस गाडी चालवू शकता. यामध्ये अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसहित 15 देशांचा समावेश आहे. अमेरिका येथील अनेक राज्यांमध्ये तुम्ही भारतीय लायसन्सच्या मदतीने गाडी चालवू शकता. यामध्ये एक वर्ष सूट असते. तुमच्या लायसन्सवरील माहिती ही इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गाडी चालवताना I-94 फॉर्म सोबत बाळगणं गरजचं आहे. या फॉर्मवर तुम्ही अमेरिकेत कधी प्रवेश केला याची माहिती देण्यात येते. कॅनडा कॅनडामध्ये देखील तुम्ही भारतीय लायसन्सच्या मदतीने गाडी चालवू शकता. या ठिकाणी 60 दिवस म्हणजेच 2 महिने भारतीय लायसन्स वापरू शकता. पण त्यानंतर कॅनडामधील लायसन्स काढावं लागणार आहे. जर्मनी जर्मनीमध्ये भारतीय लायसन्सच्या मदतीने गाडी चालवू शकता. या ठिकाणी 6 महिने भारतीय लायसन्स वापरता येतं. पण त्यानंतर जर्मनीमधील लायसन्स काढावं लागतं. पण या देशामध्ये डाव्या बाजूने गाडी चालवायला लागणार असल्याने वाहतूक नियमांसंबंधी माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भारतीय लायसन्सची जर्मन अनुवादित कॉपीजवळ ठेवणंही महत्त्वाचं आहे. स्पेन स्पेनमध्ये भारतीय लायसन्सच्या मदतीने 6 महिन्यांपर्यंत गाडी चालवली जाऊ शकते. पण या लायसन्सबरोबर एक अधिकृत आयडी देखील ठेवावं लागतं. ऑस्ट्रेलिया या देशात 3 महिने भारतीय लायसन्सच्या मदतीने गाडी चालवण्याची मुभा आहे. पण काही ठिकाणीच ही सूट देण्यात आली असून यामध्ये न्यू साउथ वेल्स, क्वींसलँड, दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाचं राजधानी क्षेत्र आणि उत्तर भागातील काही रस्त्यांवर गाडी चालवू शकता. तसेच लायसन्स इंग्रजीमध्ये असणं बंधनकारक आहे. युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डमध्ये देखील 1 वर्षासाठी भारतीय लायसन्स वैध आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी केवळ भारतीयांना विशिष्ट वाहनांसाठी परवानगी असून सर्वांसाठी ही सूट उपलब्ध नाही. न्यूझीलंड या देशात 1 वर्ष भारतीय लायसन्सच्या मदतीने गाडी चालवता येते. वाहन चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा 21 वर्ष इतकी आहे.

  (हे वाचा - ..अन्यथा अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा)

  स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमध्ये देखील 1 वर्षासाठी भारतीय लायसन्स वैध असून याची इंग्रजी प्रत असणं गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेत दभारतीय लायसन्सच्या मदतीने गाडी चालवू शकता. यामध्ये हे लायसन्स इंग्रजी भाषेत आणि त्यावर तुमची सही आणि फोटो असणं देखील आवश्यक आहे. पण काही भाड्याने गाड्या देणाऱ्या एजन्सी आंतरराष्ट्रीय लायसन्स मागू शकतात. हाँगकाँग हाँगकाँगमध्ये देखील 1 वर्षासाठी भारतीय लायसन्स वैध असून, आंतरराष्ट्रीय लायसन्सच्या मदतीने देखील गाडी चालवू शकता. स्वीडन स्वीडनमध्ये देखील 1 वर्षासाठी भारतीय लायसन्स वैध असून या ठिकाणी गाडी चालवण्यासाठी तुमचं लायसन्स इंग्रजी, स्वीडिश, जर्मन, फ्रेंच आणि नॉर्वेच्या भाषेत असणं गरजेचं आहे. फिनलँड फिनलँडमध्ये भारतीय लायसन्सच्या मदतीने 6 महिने ते 1 वर्षापर्यंत गाडी चालवू शकता. पण या देशामध्ये प्रवेश करण्यासाठी आरोग्य विमा असणं गरजेचं आहे. याच्या मदतीने 6 महिने ते 1 वर्षापर्यंत गाडी चालवता येते. सिंगापूर वाहन चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष इतकी आहे. भारतीय लायसन्स 12 महिने वापरू शकता, त्यानंतर तेथील लायसन्स काढणं गरजेचं आहे. तसंच लायसन्स इंग्रजीमध्ये असणं देखील गरजेचं आहे. मलेशिया भारतीय दूतावासामधून अधिकृत केलेलं लायसन्स असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ते इंग्रजीमध्ये असणंदेखील गरजेचं आहे. भूतान भूतानमध्ये वाहन चालवण्यासाठी परवानगी असेल, तर भारतीय लायसन्सच्या मदतीने दुचाकी आणि चारचाकी गाडी चालवू शकता.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या