Home /News /lifestyle /

Good Night Tips: तुम्हालाही रात्री लवकर झोपच लागत नाही का? वेळेवर झोप येण्यासाठी या गोष्टी करा ट्राय

Good Night Tips: तुम्हालाही रात्री लवकर झोपच लागत नाही का? वेळेवर झोप येण्यासाठी या गोष्टी करा ट्राय

सर्वांनाच व्यवस्थित झोप घेण्याची इच्छा असते. मात्र, अनेकांना वेळेवर झोप लागत नाही, यामुळे सकाळी थकवा जाणवतो. तुम्हीही अशांपैकी असाल तर, काही सोप्या उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळवू (Good Night Tips) शकता.

    नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: चांगली झोप (Good sleep) घेणं ही प्रत्येक माणसाची गरज असते. डॉक्टरही चांगल्या आरोग्यासाठी, ते कमीतकमी 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक असल्याचं सांगतात. असं न केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम (Bad effect on health) होतो. सर्वांनाच व्यवस्थित झोप घेण्याची इच्छा असते. मात्र, अनेकांना वेळेवर झोप लागत नाही, यामुळे सकाळी थकवा जाणवतो. तुम्हीही अशांपैकी असाल तर, काही सोप्या उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळवू (Good Night Tips) शकता. झोप उशिरा का येते ? काही लोकांना दिवसा झोपण्याची सवय असते. त्यामुळं ते रात्री खूप उशिरा झोपतात. काही लोक रात्री अंधारात कॉम्प्युटर किंवा मोबाईल वापरतात. त्याचा प्रकाश डोळ्यांना हानिकारक असतो. त्यामुळं झोप कमी होते किंवा लवकर झोप लागत नाही. या 5 गोष्टींचा आहारात समावेश करा जर एखाद्या व्यक्तीला झोप न मिळाल्यानं त्रास होत असेल तर, त्यानं कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेणं आवश्यक आहे. झोपण्याच्या सुमारे 4 तास आधी कर्बोदकांचं सेवन कराव. यामुळं झोप यायला कमी वेळ लागतो. याशिवाय, पिष्टमय कर्बोदकं देखील फायदेशीर आहेत. उदा., 1. पांढरा तांदूळ 2. पांढरा ब्रेड 3. अननस आणि टरबूज 4. कुकीज आणि केक्स 5. पांढरे बटाटे आणि तळलेला बटाटा हे वाचा - हा आजार कोणाला असेल तर सावधान! पालथं झोपणं अशा लोकांना जीवघेणं ठरू शकतं जलद झोपेसाठी 3 उपाय करा 1. दिवसा झोपण्याची सवय सोडा झोपेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करावे लागतील. दिवसा जास्त वेळ झोपू नका. कारण, यामुळं तुम्हाला रात्री झोपणं कठीण होईल. जर तुम्हाला खूप गरज वाटत असेल तर, दिवसभरात फक्त अर्धा तास झोप घ्या. 2. खोलीचं तापमान योग्य राखणं जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर, खोलीचं तापमान 15 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असावं. जास्त तापमानामुळं लवकर झोप लागत नाही. कारण, जास्त तापमानामुळं शरीरातील उष्णता वाढते. हे वाचा - Why Men Sleep After Romance: पुरुषांना सेक्सनंतर लगेच झोप का लागते? त्यापाठीमागील काय आहे सायन्स 3. वेळ पुन्हा पुन्हा पाहू नका काही लोकांना झोपताना वारंवार घड्याळाकडे पाहण्याची आणि झोप घेण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे, याचा अंदाज घेण्याची सवय असते. असं केल्यानं त्यांचा तणाव वाढतो आणि झोपही कमी होते. यामुळं त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेपेक्षाही आणखी कमी वेळ झोप मिळते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या