या योगासनांच्या मदतीने करा पोटाची चरबी कमी, कधीही घ्यावी लागणार नाहीत औषधं!

वेगवेगळ्या गोळ्या घेऊन वाढती चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व करूनही त्याचा 100 टक्के फायदा मिळतोच असं काही नाही.

  • Share this:

अनेकांना पोट, कंबर येथील अतिरिक्त चरबीचा त्रास होतो. वेगवेगळ्या गोळ्या घेऊन वाढती चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व करूनही त्याचा 100 टक्के फायदा मिळतोच असं काही नाही.

अशा स्थितीत योग या चांगल्या पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता. अशी काही योगासनं आहेत ज्याच्या नियमित सरावाने तुम्ही पोटाची आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकता.

नौकासन- हे आसन करण्यासाठी जमिनीवर सरळ झोपा. यानंतर आपला खांदा आणि डोकं वर उचला. यानंतर पायही सरळ रेषेत उचला. तुमचे हात, पाय आणि खांदे समांतर रेषेत असतील याकडे लक्ष असू द्या. 2 ते 3 वेळा हे आसन करा. 

त्रिकोणासन- हे आसन केल्याने कमरेकडची चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी सर्वातआधी दोन पायांमधअये अंतर ठेवून ताठ उभे रहा. यानंतर कंबरेमधून वाकत उजवा हात जमिनीला टेकवा आणि डावा हात आकाशाकडे सरळ न्या. यानंतर उंच नेलेल्या डाव्या हाताच्या बोटांकडे काही वेळ पाहा. थोड्या वेळाने ही क्रृती दुसऱ्या हातासोबतही करा.

बालासन- हे आसन करण्यासाठी सर्वातआधी वज्रासनच्या स्थितीत बसा. यानंतर आपलं डोकं जमिनीवर टेकवा. आता दोन्ही हात जमिनीवर ठेवून आपल्या जांघेने छातीवर दबाव टाका. या अवस्थेत 2 ते 4 मिनिटं रहा. हे आसन केल्याने मन आणि बुद्धी शांत राहते. शरीरातील ताण दूर होतो आणि चांगली झोप येते

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या