अ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम!

कमी वयातील अनेकांना पचनाचा त्रास होतो. याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यात झालेले गंभीर बदल.

  • Share this:

पचनशक्तीची समस्या फक्त वयोवृद्ध माणसांनाच असते असं नाही तर कमी वयातील अनेकांना पचनाचा त्रास होतो. याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यात झालेले गंभीर बदल.

पाचनशक्तीची समस्या फक्त वयोवृद्ध माणसांनाच असते असं नाही तर कमी वयातील अनेकांना पचनाचा त्रास होतो. याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यात झालेले गंभीर बदल.

यातही शरीराची फारशी हालचाल न होणं, भरपूर प्रमाणात पौष्टीक आहार न घेणं, गरजेपेक्षा जास्त विचार करणं आणि वाढत्या मानसिक ताणामुळे अनेकदा अ‍ॅसिडिटी होते.

जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल जागरुक असाल तर आहारात पौष्टीक गोष्टींचा समावेश करा आणि योगाभ्यास करा. या दोन गोष्टींनी तुम्ही अ‍ॅसिडिटीवर मात करू शकता.

आज आम्ही अ‍ॅसिडिटीवर मात करण्यासाठीचं एक खास योगासन सांगणार आहोत. याच्या नियमित अभ्यासाने तुम्ही अ‍ॅसिडिटीला दूर करू शकता.

अ‍ॅसिडिटी पीडितांनी जानुशिरासन, उष्ट्रासन, तिर्यक ताडासन, करिचक्रासन तसेच हलासन या योगासनांचा अभ्यास केला पाहिजे.

यासोबत पवनमुक्तासनचे पाच ते सात चक्रांचा अभ्यास केल्यास त्याचा चांगला फायदा मिळेल. याशिवाय जेवणानंतर पाच ते सात मिनिटं वज्रासनमध्ये नक्की बसावं.

दोन्ही पायांच्यामध्ये चार ते सहा इंचाचं अंतर ठेवून उभे रहा. दोन्ही हातांची बोटं परस्परांमध्ये अडकवा आणि त्यांना डोक्याच्यावर उंच उठवा. यानंतर पायांच्यां बोटांवर उभं राहण्याचा प्रयत्न करा.

यानंतर शरीराला उजव्या बाजूला आठ वेळा झुकवा त्यानंतर डाव्या बाजूला आठ वेळा झुकवा. यानंतर पूर्वस्थितीत या. उच्च रक्तदाब, हृदय रोग तसेच थायरॉइडच्या रुग्णांनी हे आसन करू नये.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वचजण मानसिक तणावात असतात. यामुळे अ‍ॅसिडिटी वाढते. ध्यान तसंच योगनिद्रेचा नियमित अभ्यास केल्याने सारे ताण दूर होतात आणि मनःशांती मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 09:47 PM IST

ताज्या बातम्या