मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mental Health : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा ही आसनं, मेमरी होईल सुपरफास्ट

Mental Health : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा ही आसनं, मेमरी होईल सुपरफास्ट

कोरोनाच्या काळात योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या महामारीमुळे लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या काळात योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या महामारीमुळे लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या काळात योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या महामारीमुळे लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 25 जानेवारी : धावपळीच्या जीवनात स्वतःला तंदुरुस्त ठेवणे प्रत्येकासाठी आव्हान बनले आहे. शारीरिक आरोग्यासोबतच आजकाल लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांशीही झुंजत आहेत. जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आजपासूनच योगा तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की योगासने तुम्हाला केवळ शारीरिकदृष्ट्याच तंदुरुस्त ठेवत नाही, तर योगामुळे मानसिक आरोग्य सुधारून तुमचे जीवन आणखी निरोगी आणि आनंदी बनू शकते.

योगाचार्य डॉ.शिवकुमार म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश केला पाहिजे. यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतील. त्यांच्या मते, बहुतेक लोक केवळ आसनांना योगा मानतात, ज्यामुळे त्यांना योगाचा पूर्ण लाभ मिळत नाही. त्यांच्या मते, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी लोकांनी दररोज प्राणायाम, ध्यान आणि नंतर आसन केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने दररोज सूर्योदयापूर्वी सुमारे 60 मिनिटे वेळ काढावा. शक्य असल्यास ९० मिनिटे योगासने करावीत.

Popcorn Benefits : हलकेफुलके पॉपकॉर्न तुमचंही वजन कमी करतात; इतरही आश्चर्यकारक फायदे

ध्यान आणि प्राणायामदेखील आहे खूप महत्वाचे

डॉ.शिव कुमार सांगतात की, योगा करताना आपण आपला श्वास रोखून धरला पाहिजे आणि या दरम्यान आपण शरीराच्या प्रमुख 7 बिंदूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे बिंदू आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असतात. आसना व्यतिरिक्त, दररोज ध्यान आणि प्राणायाम करणे खूप महत्वाचे आहे.

प्राणायाम केल्याने आपल्या मेंदूला अतिरिक्त ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, अपूर्ण योगासने केल्याने शरीर आणि मनाला पूर्ण लाभ मिळत नाही. म्हणूनच वेळ काढून योगा करायला हवा.

ही आसने मानसिक आरोग्यासाठी आहेत उत्तम

योगाचार्यांच्या मते, मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही पद्मासन, सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन आणि गौमुखासन करावे. जर तुम्ही ही आसने रोज योग्य पद्धतीने केलीत तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील खाता का सॅलेड? मग जरा सांभाळून, कधीही करु नका 'या' चूका

याशिवाय प्राणायाममध्ये कपालभाती, सूर्यभेदन आणि भ्रामरी प्राणायाम केल्याने मानसिक स्वास्थ्य मजबूत होते. मानसिक आरोग्यामध्ये ध्यानाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे दररोज सुमारे 20 ते 30 मिनिटे ध्यान केले पाहिजे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle