मुंबई, 29 जून : योगासनं करण्याचं महत्त्व तर आता सर्वांनाच माहिती झाले आहे. नुकतंच जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग हा शरीरासाठी जेवढा फायदेशीर आहे तेवढाच किंबहुना त्याहून जास्त फायदेशीर मानसिक आरोग्यासाठी आहे. रक्तदाब, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार तसेच आरोग्याशी निगडीत अन्य अनेक समस्यांवर योगाभ्यास प्रभावी ठरतं. महिलांकरीता योग अतिशय फायदेशीर आहे. विशेषत: स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर), हार्मोनमधील असमतोल अशा समस्यांपासून योग केल्यानं सुटका होऊ शकते. योगाने शरीर, मन आणि जीवनाचा उत्तम ताळमेळ साधता येतो. त्याचसोबत योग तुम्हाला फक्त बाहेरूनच नाही तर अंर्तमनानेही सुंदर करतं. खऱ्या अर्थाने आनंदी राहणं काय असतं हे तुम्हा-आम्हाला योगसाधना करूनच कळू शकेल. ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. यात सातत्य असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या योगासनं आणि त्यांचं महत्त्व सांगणार आहोत.
(वाचाः आता सोशल मीडियाच्या वापराने वाढू शकतो तरुणांचा कॉन्फिडन्स)
सर्वांगासन – या आसनामध्ये शरीराचा संपूर्ण भार हा खांद्याच्यावर सांभाळला जातो. नावाप्रमाणे हे आसन केल्याने संपूर्ण शरीर प्रभावित होते. तीव्र थायरॉईडचा विकार, थकलेलं शरीर, जास्तीचे वजन आणि अशक्तपणा अशा समस्या कमी होतात. हे आसन थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ग्रंथींना चालना देते आणि त्यांचे कार्य सुधारते.
योगमुद्रासन – हे आसन केल्याने पोटाचे विविध आजार दूर होतात. योगमुद्रासन करताना पोटावर ताण येतो त्यामुळे आतड्यांशी संबंधित आजार दूर होतात. मधुमेहासारखे, रक्तविकार, पोटावरची चरबी अशा समस्या दूर होतात. पचनप्रक्रिया सुधारते.
शंखासन – शंखासन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन, गॅस असे पोटाशी संबंधीत आजार कमी होण्यास मदत होते. पोट आणि कमरेचा घेर कमी होतो. याशिवाय हृदयाशी संबंधीत आजारंपासून सुटका मिळवण्यासाठी हे आसन करावे. यासोबत मानसिक ताण आणि रोग कमी होण्यास हे आसन मदत करतं.
स्वस्तिकासन – पाठदुखी, पायाचं दुखणं या समस्यांसाठी स्वस्तिकासन अत्यंत महत्त्वाचं योगासन आहे. शारीरिक आजारांसोबत मानसिक त्रास दूर करण्यास हे आसन मदत करतं. या आसनाने एकाग्रता वाढते.
गोमुखासन – या आसनाचा आकार गाईच्या मुखाप्रमाणे दिसतो. हे आसन केल्याने पाठ, खांदे, मान यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. आरोग्यासाठी हे आसन खूप उपयोगी आहे. हाडं बळकट होतात. पाठीचं दुखणं बरं होतं. पायांचा चांगला व्यायाम होतो.
(वाचाः वाढत्या वयासोबत वाढू शकतो 'या' आजारांचा धोका...)
चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली, इतर 18 बातम्या