ही पाच योगासनं आहेत High Blood Presure साठी रामबाण उपाय

ही पाच योगासनं आहेत High Blood Presure साठी रामबाण उपाय

बदलत्या जीवनशैलीमुळे आज आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. यातही रक्तदाब आणि मधूमेह आजाराचे रुग्ण दिवसागणित वाढत आहेत.

  • Share this:

बदलत्या जीवनशैलीमुळे आज आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. यातही रक्तदाब आणि मधूमेह आजाराचे रुग्ण दिवसागणित वाढत आहेत. सामान्यपणे शरीरात 120/80 ते 140/90 दरम्यान रक्त प्रवाह सुरू असतो. मात्र जेव्हा रक्त प्रवाह याहून जास्त होतो, उच्च रक्तदाबाची समस्या सुरू होते. अशावेळी औषधांसोबत योगच्या मदतीने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.

आसन- ताडासन, त्रिकोणासन, वीरासन, सूर्य नमस्कार, वज्रासन, कण्डूकासन, सुप्त वज्रासन, अर्धमत्स्येद्रासन, गोमुखासन, पवनमुक्तासन, मर्कटासन तसेच शलभासन या आसनांचा नियमित अभ्यास केल्यास रक्तदाब निश्चित नियंत्रणात येऊ शकतो.

पवनमुक्सानाचा अभ्यास- जमिनीवर पाठीवर रिलॅक्स झोपा. उजव्या पायाला गुडघ्याकडून दुमडून तो दोन्ही हातांनी पकडून छातीकडे न्या. या दरम्यान, श्वास घ्या आणि सोडा. यानंतर डोकं जमिनीपासून वर करून उजवा पाय नाकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. काही वेळ या स्थितीत राहून नंतर पूर्व स्थितीत या. हीच क्रिया डाव्या पायासोबतही करा. सुरुवातीला दोन ते तीन वेळा हे आसन करा. मात्र कालांतराने 10 ते 15 वेळा हे आसन करा.

प्राणायम- उच्च रक्तदाबाच्या रुग्ण ज्यांनी यापूर्वी कधी योग केलं नाही ते प्राणायमपासून सुरुवात करू शकता.

काय आहे योग्य पद्धत- पद्मासन, सिद्धासन, सुखासन किंवा खुर्चीवर ताठ अवस्थेत बसा. एक दीर्घ श्वास घेत पोठ फुगवा. त्यानंतर छाती फुगवा. जेव्हा शरीरभर पूर्ण श्वास जाईल तेव्हा हळू- हळू श्वास सोडा. श्वास सोडताना छातीवर दाब द्या किंवा पोटावर दाब द्या. सुरुवातीला किमान 12 वेळा हे आसन करा. त्यानंतर हळूहळू या आसनाची संख्या वाढवा.

रात्री चांगली झोप घेण्यात भारतीय अव्वल- आंतरराष्ट्रीय सर्व्हे

Parle G कंपनीत काम करणाऱ्या 10 हजार लोकांची जाऊ शकते नोकरी, काय आहे पूर्ण प्रकरण

Period च्या दुखण्याला आता या तेलामुळे मिळेल आराम, एकदा वापरून पाहा!

लसूण सोलण्याचा हा व्हिडिओ होतोय VIRAL, आतापर्यंत 1 अब्ज लोकांनी पाहिला

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 21, 2019, 7:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading