मुंबई, 1 फेब्रुवारी : मसालेदार अन्न खाल्ल्यास, जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास आणि जेवल्यानंतर चालण्याची सवय नसल्यास पचनाशी संबंधीत समस्या उद्भवतात. पोटाची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी नास्ता आणि साधे अन्न खाणे आवश्यक आहे. जेवताना किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, जेवणाच्या अर्धा तास आधी आणि नंतर पाणी पिणे चांगले असते.
पचनाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतोवर स्वतःला हायड्रेट ठेवावे. तुमच्या रोजच्या जेवनात धान्याचा कमी आणि फळं-भाज्यांचा जास्त प्रमाण समावेश करा. रात्री झोपण्याधी दोन तासाने जेवन करा आणि रात्री जास्त खाऊ नका. नियमितपमे योग्य वेळी झोपा आणि पहाटे लवकर जागे व्हा. हे नियम पाळल्याने गॅस आणि पोटाशीसंबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत होईल. परंतु तुम्हाला हे शक्य नसल्यास काही योगासनं करून देखील तुम्ही पोटाती गॅसची समस्या आणि पचनाची समस्या दूर करू शकता.
चिंता-नैराश्य-पोटाच्या समस्या, अशा अनेक त्रासांवर उपाय आहे कश्मिरी पिंक टी, पाहा रेसिपी
सरावाची सुरुवात
तुम्ही पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सुखासनामध्ये चटईवर बसा आणि दोन्ही हात जोडून तुमचे संपूर्ण शरीर वर पसरवा, 10 पर्यंत मोजा आणि आपले हात खाली करा आणि रिलॅक्स व्हा. यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि ध्यान करा.
गॅसची समस्या दूर करण्यासाठी करा हे आसन
ताडासन
पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठी ताडासन हे सर्वात सोपे आणि प्रभावी योगासन आहे. हे आसन करण्यासाठी चटईवर उभे रहा आणि दोन पायांमध्ये थोडे अंतर ठेवून हातांची बोटे एकमेकांना चिकटवा. आता कंबर आणि मान सरळ ठेवा आणि या स्थितीत दोन्ही हात वर करा. आता श्वास घेताना या स्थितीत थांबा. शरीराला शक्य तितके ताणून घ्या. पोट आतून खेचा आणि समोरच्या एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करा. 20 पर्यंत मोजा आणि त्यानंतर हळूहळू हात खाली करा. या स्थितीत बराच वेळ राहिल्यास पोटातील हवा खालच्या दिशेने जाऊ लागते. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही याचा सराव करू शकता.
तिर्यक तडासन
हे आसन करण्यासाठी हात जोडून ताडासन स्थितीत या आणि दीर्घ श्वास घ्या. आता श्वास सोडत याच स्थितीत डावीकडे वाका आणि श्वास घेत पुन्हा सरळ उभे राहा. त्यानंतर श्वास सोडत उजव्या बाजूला वाका आणि श्वास घेत सरळ उभे रहा. या आसनाचा 10 वेळा सराव करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार त्याचा सराव वाढवू शकता.
मालसन
हे आसन करण्यासाठी हळूहळू पंजांच्या साह्याने गुडघे वाकवून बसा आणि दोन्ही पायाच्या मध्ये अंतर राखा. आहात हात गुडघ्यांमध्ये ठेवत नमस्काराची मुद्रा बनवा. हे करताना कंबर आणि मान सरळ ठेवा आणि काही वेळ या आसनात स्तिर राहा. याचा नियमित सराव करा.
मानेवरील चामखीळ आणि वाढत्या वजनाकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते 'या' आजाराचे लक्षण
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Yoga day