मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता योगाने सुधारा डोळ्यांची दृष्टी; नियमित करा ही सोपी योगासनं

आता योगाने सुधारा डोळ्यांची दृष्टी; नियमित करा ही सोपी योगासनं

Yoga for eyes : डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील अशी काही योगासनं आहेत. जी दररोज केल्यास दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल.

Yoga for eyes : डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील अशी काही योगासनं आहेत. जी दररोज केल्यास दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल.

Yoga for eyes : डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील अशी काही योगासनं आहेत. जी दररोज केल्यास दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल.

मुंबई, 08 जानेवारी : शरीरातील पाच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे (Eye health tips) हे महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर (Eye problem) गंभीर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. सतत मोबाइल, टीव्ही पाहणं, कम्प्युटर, लॅपटॉपवर अनेक तास काम करणं यामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे (Work From Home), शालेय शिक्षण ऑनलाइन झाल्यामुळे डोळ्यांचे विकार वाढताना दिसत आहेत. या गोष्टी अपरिहार्य आहेत. परंतु, यामुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी घरच्या घरी काही उपाययोजना करणं नक्कीच शक्य आहे. त्यापैकीच एक म्हणजे योगासनं (Yoga for eye).

योगा करणं आपल्या शरीरासाठीच नाही तर अगदी डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील अशी काही योगासनं आहेत. जी दररोज केल्यास दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल.

सर्वांगासन (Sarvangasan) - डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. या आसनाची सुरुवात पाठीवर झोपून करावी. त्यानंतर आपले हात शरीराजवळ ठेवावेत. हळूहळू पाय जमिनीवरून उचलावेत आणि ते लंबरूपात ठेवावेत. त्यानंतर हळूहळू पाय वरच्या बाजूला उचला. सावकाशपणे ओटीपोट वर उचला. आता हळूहळू हात जमिनीवरून उचला आणि तळवे पाठीवर ठेवा. खांदे, धड, ओटीपोट आणि पाय सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करा. हनुवटीनं छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि डोळे पायांवर केंद्रित ठेवा.

हे वाचा - सकाळी-सकाळी नव्हे संध्याकाळी करा व्यायाम; सगळे फायदे वाचून तुम्हीही नियोजन बदलाल

हलासन (Halasana) - डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. हे आसन करताना सर्वप्रथम पाठीवर झोपा. त्यानंतर आपले तळवे शरीराशेजारी जमिनीवर ठेवा. पोटातल्या स्नायूंचा वापर करून पाय 90 अंश वर करा. तळवे जमिनीवर घट्ट दाबा आणि पाय डोक्यामागे जाऊ द्या. पायाच्या बोटांनी मागील बाजूस स्पर्श करता यावा, यासाठी पाठीचा मधला आणि खालचा भाग वर घ्या. छाती हनुवटीजवळ आणण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करा. काही वेळ या मुद्रेत राहिल्यानंतर सामान्य स्थितीत या.

चक्रासनाचे (Chakrasana) - फायदे खूप आहेत. तसंच हे आसन डोळ्यांसाठीही चांगलं आहे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा. तुमचे पाय जमिनीवर घट्ट आहेत याची खात्री करून मग गुडघ्यात वाकवा. तळवे आकाशाच्या दिशेने नेऊन हात कोपरातून वाकवा. हात खांद्यापासून फिरून दोन्ही तळवे जमिनीवर ठेवा. श्वास घेऊन तळवे आणि पायांवर दाब द्या. शरीराचा आकार कमानीसारखा होण्यासाठी संपूर्ण शरीर उचला. मागे वळून पाहा आणि मानेला आराम देण्यासाठी डोकं हळूच मागील बाजूस न्या. काही वेळ या मुद्रेत राहिल्यानंतर सामान्य स्थितीत या.

हे वाचा - एक तेल फायदे अनेक; हिवाळ्यातील प्रत्येक समस्येवर रामबाण आहे हे ऑईल

बकासन (Bakasana) - सुरू करताना थोडं पुढे झुका आणि तळवे पायांसमोर पण थोडे दूर अंतरावर सपाट ठेवा. बोटं पुढील बाजूस राहतील याची काळजी घ्या. कोपरं सरळ ठेवा आणि गुडघे शक्य तितके बगलेजवळ ठेवा. तुमच्या शरीराचा सर्व भार हातावर पडेल अशा प्रकारे झुका. हे संतुलन कायम ठेवत हळूहळू दोन्ही पाय जमिनीवरून उचला. पाय एकत्र आणा आणि हात शक्य तितके सरळ करण्याचा प्रयत्न करा. या मुद्रेत काही वेळ राहून सामान्य स्थितीत यावं. ही आसनं नियमित केल्यास डोळ्यांचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील.

First published:

Tags: Eyes damage, Fitness, Health, Lifestyle, Yoga day