Home /News /lifestyle /

WORK FROM HOME - पाठ-मानेच्या दुखण्यापासून मुक्ती देणारा योगा; VIDEO पाहा

WORK FROM HOME - पाठ-मानेच्या दुखण्यापासून मुक्ती देणारा योगा; VIDEO पाहा

मिठानंही कंबरेला शेक देता येतो. अगोदर मीठ चार-पाच मिनिटं गरम करा. आणि एका स्वच्छ कापडात गुंडाळून त्यानं कंबर शेका.

मिठानंही कंबरेला शेक देता येतो. अगोदर मीठ चार-पाच मिनिटं गरम करा. आणि एका स्वच्छ कापडात गुंडाळून त्यानं कंबर शेका.

कोरोना काळात हे योगा प्रकार तुम्हाला फिट आणि निरोगीही ठेवतील.

    मुंबई, 08 जुलै : सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे (CORONA LOCKDOWN) कित्येक जण वर्क फ्रॉम होम (WORK FROM HOME) करत आहेत. मात्र घरी असल्याकारणाने ऑफिसप्रमाणे बसणं होत नाही. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार बसतो. मात्र काम करताना नीट न बसल्यास पाठ आणि मानेवर ताण पडतो आणि मग पाठीचं, मानेचं दुखणं सुरू होतं. तुम्हालादेखील एव्हाना अशा वेदना जाणवत असतील. पाठ आणि मान कुरकुर करू लागली असेल. फक्त वर्क फ्रॉम होमच नाही तर कित्येक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आपली ड्युटी बजावत आहेत. कित्येक तास काम करत असल्याने त्यांनादेखील शारीरिक वेदना उद्भवत आहेत. म्हणजे काम घरातून करा किंवा घराबाहेर राहून तुमच्या या शारीरिक वेदना दूर ठेवण्यासाठी तुम्हाला योगा मदत करेल. योगाचे असे काही प्रकार आहेत जे तुम्हाला या वेदनांपासून आराम देतील. आयुष मंत्रालयाने असे काही योगाचे प्रकार सांगितलेत. स्कंध चक्र - बसून बसून खांदे आखडले असल्यास हा योगा करा. ताडासन - स्नायूं आखडले असल्यास हे योगासन करणं चांगलं. कटिचक्रासन - कंबर लवचिक होते आणि श्वसनसंबंधी आजार दूर करण्यास मदत करतं. अर्ध उष्ट्रासन - कमरेच्या वेदना दूर होता. हे वाचा - हॉट अँड फिट! अभिनेत्रीच्या स्टाइलिश वर्कआऊटचे PHOTO पाहून तुम्हीही दिवाने व्हाल शसकासन - सध्या कोरोना काळात मानसिक शांतीही गरजेची आहे आणि ही मानसिक शांती दूर करण्यासाठी शसकासन फायदेशीर आहे. उतान मंडुकासन - कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात फायदेशीर ठरेल असं हे आसन. यामुळे मान आणि कमरेच्या वेदना दूर तर होतातच शिवाय फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. कपालभाति - कफसंबंधी काही समस्या असल्यास दूर होण्यास मदत होते. अनुलोम-विलोम प्राणायाम - यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जी सध्या कोरोनाची महासाथ आणि नुकताच सुरू झालेल्या पाऊस आणि त्यामुळे बळावणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. हे वाचा - जास्त खाल्लं नाही तरी तुमचं पोट फुगतं? असू शकतो पोटाचा गंभीर आजार त्यामुळे काही मिनिटांत होणारे आणि सहज सोपे असे हे योगाप्रकार आहेत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरीही फिट आणि हेल्दी राहू शकता. त्यामुळे आजपासूनच हे योगा करायला सुरुवात करा. संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Work from home, Yoga

    पुढील बातम्या